ETV Bharat / sitara

१३ वर्षानंतरही 'ओमकारा'च्या गाण्याची भूरळ, अजयने शेअर केली पोस्ट

author img

By

Published : Jul 28, 2019, 10:05 PM IST

'ओमकारा' चित्रपटाची कथा ही शेक्सपिअरच्या 'ओथेलो' या कादंबरीवर आधारित होती. अजय देवगनने यामध्ये 'ओमकार शुक्ला' हे पात्र साकारले होते. तर, अजयसोबत करिना कपूर ही मुख्य भूमिकेत झळकली होती.

१३ वर्षानंतरही 'ओमकारा'च्या गाण्याची भूरळ, अजयने शेअर केली पोस्ट


मुंबई - अभिनेता अजय देवगनच्या करिअरमधला एक उत्कृष्ट चित्रपट म्हणून 'ओमकारा'चे नाव घेतले जाते. या चित्रपटाला १३ वर्षे पूर्ण झाले आहे. तरीही या चित्रपटाच्या गाण्यांची चाहत्यांवर छाप आहे. यातील गाण्यांनी प्रेक्षकांवर भूरळ पाडली होती. ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. अजयने या चित्रपटाच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे.

  • #13YearsToOmkara. Throwback to the great saga of love, ambition, treachery and politics.

    — Ajay Devgn (@ajaydevgn) July 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अजयच्या पोस्टसोबतच 'ईरॉस नाऊ'च्या अकाऊंटवरुनही एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये 'ओमकारा'च्या सर्व गाण्यांची झलक पाहायला मिळते.

'ओमकारा' चित्रपटाची कथा ही शेक्सपिअरच्या 'ओथेलो' या कादंबरीवर आधारित होती. अजय देवगनने यामध्ये 'ओमकारा शुक्ला' हे पात्र साकारले होते. तर, अजयसोबत करिना कपूर ही मुख्य भूमिकेत झळकली होती.

दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या चित्रपटात अजय आणि करिनासोबत विवेक ओबेरॉय, बिपाशा बासू, पंकज त्रिपाठी हे देखील झळकले होते.

बिपाशाचे आयटम सॉन्ग 'बिडी जलैले जिगर से पिया' आणि 'नमक इस्क दा', हे गाणे प्रचंड गाजले होते.

या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. ४२.४ कोटीचा व्यवसाय या चित्रपटाने केला होता.

Intro:Body:

dummy news


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.