ETV Bharat / sitara

उर्वशी रौतेलाचा स्वीमिंग पूलमधील व्हिडिओ झाला व्हायरल

author img

By

Published : Mar 28, 2020, 8:58 PM IST

उर्वशी रौतेलाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडओत ती स्वीमिंग पुलमध्ये आराम करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओला भरपूर प्रतिक्रिया मिळत आहेत.

Urvashi Rautela in news
उर्वशी रौतेला

मुंबई - अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. अलिकडेच तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडओत ती स्वीमिंग पुलमध्ये आराम करताना दिसत आहे. तिने या व्हिडिओला कॅप्शनही फार मस्त दिलंय. ''पूर्वी मी बाहेर जायला फार खूप सहज समजत होते. तुम्ही गुंतून राहण्यासाठी काय करता?'' असे तिने लिहिलंय. तिच्या या व्हिडिओला भरपूर प्रतिक्रिया मिळत आहेत.

उर्वशी रौतेला सध्या घरामध्ये बंद आहे. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी तिने स्वतःला एकटे करुन घेतलंय. व्हिडिओ पाहून वाटते की तिला घराबाहेर जाणे ती खूप मिस करत आहे.

उर्वशीचा आणखी एक व्हिडिओ खूप व्हायरल झालाय. यात ती डान्स करताना दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.