ETV Bharat / sitara

'वो लडकी है कहां' या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत प्रतीक गांधीसोबत झळकणार तापसी पन्नू

author img

By

Published : Feb 22, 2021, 6:47 PM IST

तापसी पन्नूने आगामी 'वो लडकी है कहां' या चित्रपटाची घोषणा केली आहे. स्कॅम १९९२ या गाजलेल्या वेब सिरीजमुळे लोकप्रिय ठरलेला प्रतीक गांधीसोबत तिचा हा चित्रपट असेल.

Taapsee Pannu
प्रतीक गांधीसोबत झळकणार तापसी पन्नू

मुंबई - कोविड -१९ अंतर्गत असलेले निर्बंध कमी झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू एकापाठोपाठ एक चित्रपटांची प्रतीक्षा करीत आहे. अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटाच्य़ा शुटिंगला सुरुवात करणार्‍या तापसीने आपल्या इंटरेस्टींग चित्रपटांपैकी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. 'वो लडकी है कहां' या आगामी चित्रपटामध्ये ती दिसणार असून यामध्ये २०२० चा लोकप्रिय स्टार प्रतीक गांधीदेखील दिसणार आहे.

बातमीनुसार, तापसी एका पोलिसांची भूमिका साकारताना दिसणार आहे, तर 'वो लाडकी है कहां' चित्रपटात प्रतीक गांधीदेखील झळकणार आहे. सिद्धार्थ रॉय कपूर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक अर्शद सय्यद करणार आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना तापसी म्हणाली, “सिदसारख्या निर्मात्याबरोबर भागीदार होण्यामुळे आणि स्कॅम 1992 या गाजलेल्या वेब सिरीजमधील प्रतीक गांधी यांच्या भूमिकेमुळे मी प्रभावित झाले आहे.”

दरम्यान, पन्नूने दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या आगामी थ्रिलर 'दोबारा'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. 'दोबारा'ची निर्मिती एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्स अंतर्गत कल्ट मुव्हीज आणि सुनीर खेतेरपालसह अथेना आणि गौरव बोस यांच्या 'व्हर्मिलियन वर्ल्ड प्रॉडक्शन'च्या वतीने केली जात आहे.

हेही वाचा - तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप 'दोबारा'साठी पुन्हा आले एकत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.