ETV Bharat / sitara

करण जोहरच्या समर्थनार्थ उतरली स्वरा भास्कर, म्हणाली..

author img

By

Published : Jun 29, 2020, 8:05 PM IST

सुशांतसिंहच्या निधनानंतर निर्माता करण जोहरवर बॉलिवूडमध्ये घराणेशाही चालवत असल्याचा आरोप होत आहे. करणच्या समर्थनार्थ आता स्वरा भास्कर उतरली आहे. कॉफी विथ करण शो या चॅट शोमध्ये नेपोटिझ्मवर केलेले कॉमेंट्स करणने हटवलेले नाहीत, असे ती म्हणाली.

SWARA-SUPPORTS-KARAN-JOHAR
करणच्या समर्थनार्थ उतरली स्वरा भास्कर

मुंबई - अभिनेत्री स्वरा भास्कर हिने घराणेशाहीच्या मुद्द्यावर घेरण्यात आलेल्या करण जोहरच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली आहे. सुशांतच्या निधनानंतर करण जोहर बॉलिवूडमध्ये घराणेशाही पोसत असल्याचा आरोप काहीजणांच्याकडून केला जातोय. त्याच्यावर बहिष्कार घालण्याची भाषाही ऐकायला मिळते. अशावेळी करणच्या समर्थनार्थ काही सेलेब्स येत आहेत. अशातच स्वराने आपला पाठिंबा दर्शवला आहे.

  • Let’s take a moment & acknowledge that @karanjohar took this question on the chin, & answered in a candid & honest manner not taking unwarranted personal offense. Let’s also acknowledge that he didn’t have the infamous #nepotism comment removed from his chat show which he cud’ve. https://t.co/XhEW5mBL7f

    — Swara Bhasker (@ReallySwara) June 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

करण जोहरवर टीका होत असतानाही त्याने कॉफी विथ करणच्या चॅट शोमध्ये आलेल्या घराणेशाही विरोधी टीका करणाऱ्या कॉमेंट्स हटवलेल्या नाहीत. याला उल्लेख करीत स्वरा भास्करने पोस्टमध्ये लिहिलंय, "एका क्षणी थांबून ही गोष्ट मान्य करुयात की, करण जोहरने या प्रश्नांचा सामना केला आहे आणि पूर्ण प्रामाणिक राहून याची उत्तरे दिली आहेत. हेदेखील मानण्यासारखे आहे की, त्याने नेपोटिझ्मवरील कॉमेंट्स त्याने हटवलेल्या नाहीत. त्याची इच्छा असती तर त्या तो हटवू शकला असता."

  • I don’t have any projects in the pipeline with Karan ... but it is only right and fair to give credit where due! https://t.co/OZHXpM59QX

    — Swara Bhasker (@ReallySwara) June 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - सुशांतच्या वडिलांना भेटून ऊर्जा अन् हिंमत मिळाली - रतन राजपूत

स्वराने करणचे समर्थन केल्यामुळे एका युजरने तिला प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना ती म्हणाली की, येत्या काळात तिचा कोणताही चित्रपट करणसोबत नाही. ती केवळ पाठिंबा देत आहे.

कंगना रनौत ही पहिली अभिनेत्री होती जिने करण जोहरवर घराणेशाहीचा उघडपणे त्याच्याच 'कॉफी विथ करण' या शोमध्ये आरोप केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.