ETV Bharat / sitara

पहिल्या मुलाच्या जन्मानंतर पुन्हा शूटिंगला सुरूवात करणार - अनुष्का शर्मा

author img

By

Published : Nov 28, 2020, 7:43 PM IST

अनुष्का शर्मा सध्या ‘एंडोर्समेंट’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. मात्र त्यानंतर ती मुलाच्या जन्मासाठी सुट्टी घेणार असून त्यानंतर ती आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर ती शूटिंगमध्ये परत येईल आणि घर, मूल आणि व्यावसायिक जीवन यांच्यात सुसंवाद साधेल.

Anushka Sharma
अनुष्का शर्मा

मुंबई - अभिनेत्री अनुष्का गर्भवती आहे. ती आपल्या आरोग्याची खूप काळजी घेत आहे. यासाठी तिचा पती विराट कोहलीदेखील खूप काळजी घेत आहे. सध्या तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असला तरी तो बाळंतपणाच्यावेळी तो अनुष्कासोबत असणार आहे.

अनुष्का म्हणते की, आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर ती शूटिंगमध्ये परत येईल आणि घर, मूल आणि व्यावसायिक जीवन यांच्यात सुसंवाद साधेल.

हेही वाचा - "लॉ ऑफ लव्ह" ९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात येण्यासाठी सज्ज

अनुष्का म्हणाली, "सेटवर आल्यामुळे मला खूप आनंद होत आहे आणि पुढचे काही दिवस मी शूटिंग सुरुच ठेवणार आहे. त्यानंतर माझ्या पहिल्या मुलाला जन्म दिल्यानंतर मी पुन्हा शूटिंगवर परत येईन आणि माझे घर, बाळ आणि व्यावसायिक गोष्टी यांच्या सामंजस्य ठेवण्याचा प्रयत्न करेन. कारण अभिनय केल्याने मला खरोखर आनंद मिळतो. "

अनुष्का सध्या ‘एंडोर्समेंट’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे आणि कोविड -१९च्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून तिचे काम पार पाडत आहे.

हेही वाचा - मनीष पॉलने सुरू केले 'जुग जुग जियो'चे शूटिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.