ETV Bharat / sitara

पायऱ्यांचा वापर करून 'असा' करावा व्यायाम, शिल्पाने दिला फिटनेस मंत्र

author img

By

Published : Mar 20, 2020, 5:32 PM IST

अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून फिटनेसच्या ट्रिक सांगत असते. व्यायामासोबतच पौष्टिक आहाराविषयी देखील ती माहिती देत असते.

Shilpa Shetty Fitness tips, Shilpa Shetty Fitness video, Shilpa Shetty latest news, Shilpa Shetty upcoming film, Shilpa Shetty news
पायऱ्यांचा वापर करुन 'असा' करावा व्यायाम, शिल्पाने दिला फिटनेस मंत्र

मुंबई - बॉलिवूड कलाकार आपल्या फिटनेससाठी अतिशय सजग असतात. फिट राहण्यासाठी ते तासनतास जीममध्ये वर्कआऊट करत असतात. त्यांच्या फिटनेसमागचे रहस्य जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून फिटनेसच्या ट्रिक सांगत असते. व्यायामासोबतच पौष्टिक आहाराविषयी देखील ती माहिती देत असते. अनेकांना जीममध्ये जाऊन व्यायाम करण्याचा कंटाळा असतो. त्यामुळे शिल्पाने घरच्या घरी पायऱ्यांचा वापर करून व्यायाम कसा करावा, हे एका व्हिडिओद्वारे सांगितले आहे.

शिल्पा शेट्टी या व्हिडिओमध्ये चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. तसेच, तिने काही फिटनेस मंत्र देखील दिले आहेत. तिच्या या व्हिडिओवर आत्तापर्यंत १ लाखापेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

हेही वाचा -COVID-19 : कार्तिक आर्यनची हटके स्टाईलमध्ये जनजागृती, पाहा कलाकारांचे व्हिडिओ

शिल्पा तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने ती दुसऱ्यांदा आई झाल्याची माहिती दिली आहे. सरोगसीद्वारे ती दुसऱ्यांदा आई बनली आहे.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, लवकरच ती अभिनेता अभिमन्यू दस्सानीसोबत 'निकम्मा' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातून ती तब्बल १० वर्षानंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. त्यामुळे तिला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते देखील आतुर आहेत.

हेही वाचा -कोरोनामुळे मिळालेल्या वेळेचा सलमान खानने 'असा' केला उपयोग, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.