ETV Bharat / sitara

राम गोपाल वर्मा यांना कोरोनाची लागण? ट्विटने उडवली खळबळ

author img

By

Published : Apr 2, 2020, 2:41 PM IST

जगभरात या कोरोना विषाणूने थैमान घातले असताना आपल्याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे ट्विट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी केले होते.

Ram Gopal Varma troll after his twit related with COVID  19 Test
राम गोपाल वर्मा यांना कोरोनाची लागण? ट्विटने उडवली खळबळ

मुंबई - कलाविश्वात गायिका कनिका कपूर हिला कोरोनाची लागण झाल्यानंतर सर्वांना धक्का बसला होता. जगभरात या कोरोना विषाणूने थैमान घातले असताना आपल्याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे ट्विट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी केले होते. त्यांच्या या ट्विटनंतर कला विश्वात खळबळ उडाली होती.

राम गोपाल वर्मा यांनी 1 एप्रिल रोजी त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले होते. मात्र काही वेळानंतर त्यांनी पुन्हा एकदा एक ट्विट करून डॉक्टरांनी आपल्याला एप्रिल फुल बनवलं असं सांगितलं.

  • My doctor just told me that I tested positive with Corona

    — Ram Gopal Varma (@RGVzoomin) April 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडिया ते चांगलेच ट्रोल झाले. अशा कठीण परिस्थितीत असं धक्कादायक ट्विट केल्यामुळे त्यांना नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे.

  • Sorry to disappoint, but now he tells me it’s a April Fool joke 😳 it’s his fault and not mine

    — Ram Gopal Varma (@RGVzoomin) April 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.