ETV Bharat / sitara

आमिरचा मुलगा जुनैद खानच्या पहिल्या सिनेमाच्या शुटिंगला पुन्हा सुरुवात

author img

By

Published : Jun 8, 2021, 10:37 PM IST

सोमवारपासून महाराष्ट्र अनलॉक करण्याची पाच-स्तरीय योजना अस्तित्त्वात आल्यानंतर जुनैद खानच्या पदार्पणाच्या महाराजा या चित्रपटाच्या शुटिंगल पुन्हा सुरुवात झाली आहे.

Maharashtra unlock
आमिरचा मुलगा जुनैद खान

मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा मुलगा जुनैद खानचा पहिला चित्रपट 'महाराजा' पुन्हा एकदा ट्रॅकवर आला आहे. कारण कोरोना संक्रमण रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधातून महाराष्ट्र हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे पुन्हा शूटिंग सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तयार असलेल्या जुनैदने १५ फेब्रुवारीपासून आपल्या पहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. दोन महिने शूटिंग झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी 14 एप्रिलपासून राज्यभरात 15 दिवसाचे कर्फ्यू आणि लॉकडाऊनचा निर्णय घेतला आणि शूटिंग थांबवण्यात आले.

Maharashtra unlock
आमिरचा मुलगा जुनैद खान

चित्रपट आणि टेलिव्हिजन शूट पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी दिशानिर्देशांचा अवलंब करीत 'महाराजा' चित्रपटाचे शूटिंग आता पुन्हा सुरू होऊ शकेल. यासाठी टीम बायो-बबल तयार करणार असून रोज आठ तासातच शूटिंग पूर्ण करण्यात येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, टीमने आजपासून मुंबईच्या मरोलमध्ये तयार केलेल्या सेटवर शूटिंग पुन्हा सुरू केले आहे.

Maharashtra unlock
आमिरचा मुलगा जुनैद खान

सिद्धार्थ पी. मल्होत्रा ​​दिग्दर्शित 'महाराजा' या यश राज फिल्म्सच्या चित्रपटातून जुनैद बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. १८६२ च्या महाराज लिबेल प्रकरणावर आधारित हा चित्रपट आहे. ज्यात महाराजने, प्रत्यक्षात एक धर्मगुरू असलेल्या गुजराती पत्रकार आणि सुधारक करसनदास मुळजी यांच्यावर वल्लभाचार्य संप्रदाय या हिंदू पंथाच्या मूल्यांवर प्रश्न विचारणारा लेख लिहिल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. या चित्रपटात जुनैद करसनदास मुळजी ही व्यक्तीरेखा साकारत आहे.

'महाराजा' या चित्रपटामध्ये जुनैदशिवाय अर्जुन रेड्डी चित्रपटाची अभिनेत्री शालिनी पांडे, शर्वरी वाघ आणि जयदीप अहलावत यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

हेही वाचा - शीरॉक्स' उपक्रमासाठी जॅकलिन फर्नांडीजला 'टाइम्स 40 अंडर 40'च्या यादीमध्ये स्थान!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.