ETV Bharat / sitara

'खाली पीली' चित्रपटाचा ६ नोव्हेंबरला झी 5 वर प्रीमियर

author img

By

Published : Nov 4, 2020, 7:59 PM IST

'खाली पीली'या चित्रपटाचा प्रीमियर ६ नोव्हेंबरला झी 5 (झेड 5) वर होणार आहे. मकबूल खान दिग्दर्शित या रोमँटिक अ‍ॅक्शन चित्रपटात ईशान खट्टर आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहे.

'Khalli Pilli'
'खाली पीली'

मुंबई - ईशान खट्टर आणि अनन्या पांडेचा 'खाली पीली'या चित्रपटाचा प्रीमियर ६ नोव्हेंबरला झी 5 (झेड 5) वर होणार आहे. 'खाली पीली' हा मकबूल खान दिग्दर्शित रोमँटिक अ‍ॅक्शन चित्रपट असून अली अब्बास जफर आणि हिमांशू मेहरा निर्मित आहे. या चित्रपटात ईशान खट्टर आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात जयदीप अहलावत व्हिलनची भूमिका साकारत आहे.

या चित्रपटात पूजाची भूमिका साकारणार्‍या अनन्या पांडेने सांगितले की, 'खाली पीली' झी 5 वर रिलीज होत आहे याबद्दल मला खूप उत्सुकता आहे आणि हे १९० पेक्षा जास्त देशांमध्ये दिसणार आहे, जे खूपच थरारक आहे. मला आशा आहे की प्रेक्षकांना माझी ही भूमिका आवडेल कारण ही भूमिका माझ्या पूर्वीच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे, ही चाहत्यांसाठी दिवाळीची भेट आहे आणि मला आशा आहे की ते आपल्या कुटुंबियासोबत घरात बसून आरामात या चित्रपटाचा आनंद घेतील. "

ईशान खट्टर म्हणाला, “ 'खाली पीली' हा एक मनोरंजक चित्रपट आहे आणि मला आनंद आहे की हा सिनेमा या रिलीजच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना उपलब्ध होईल. हा चित्रपट बनविण्यात खूप मजा आली होती आणि ही उर्जा पडद्यावरही दिसेल. "

'खाली पीली' चित्रपटाची कहाणी पूजा (अनन्या पांडे - वेश्याची भूमिका साकारणारी) आणि ब्लॅकी (ईशान खट्टर - टॅक्सी ड्रायव्हर) यांच्या भोवती फिरते. अठराव्या वर्षी पूजा भरलेल्या पिशवीची चोरी करुन पळून जाते आणि तिची ब्लॅकीशी भेट होते. त्यानंतर त्यांच्यात ज्या गोष्टी घडतात हे चित्रपटात दाखवण्यात आलंय.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.