ETV Bharat / sitara

अनन्या-ईशानची जोडी झळकणार एकत्र, 'या' सिनेमात करणार स्क्रीन शेअर

author img

By

Published : Aug 28, 2019, 4:30 PM IST

चंकी पांडे यांची मुलगी अनन्या 'स्टुडंट ऑफ द ईअर २' या सिनेमातून पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये झळकली. यानंतर सध्या ती 'पती-पत्नी और वो'च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. अशात आता तिनं ईशानसोबतचा हा आगामी चित्रपटही साईन केला आहे

अनन्या-ईशानची जोडी झळकणार एकत्र

मुंबई - 'धडक' या सिनेमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता ईशान खट्टर या चित्रपटानंतर फारसा चर्चेत राहिला नव्हता. अशात आता त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी, की ईशानने एक नवा चित्रपट साईन केला आहे. या सिनेमात त्याच्यासोबत झळकणार आहे, अभिनेत्री अनन्या पांडे.

चंकी पांडे यांची मुलगी अनन्या 'स्टुडंट ऑफ द ईअर २' या सिनेमातून पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये झळकली. यानंतर सध्या ती 'पती पत्नी और वो'च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. अशात आता तिनं ईशानसोबतचा हा आगामी चित्रपटही साईन केला आहे. 'खाली पीली' असं या सिनेमाचं शीर्षक आहे.

  • IT'S OFFICIAL... Ishaan and Ananya Panday... Zee Studios and Ali Abbas Zafar [#Sultan, #TZH, #Bharat] join hands to produce #KhaaliPeeli... Directed by Maqbool Khan... Produced by Zee Studios, Ali Abbas Zafar and Himanshu Mehra... Starts 11 Sept 2019... 12 June 2020 release. pic.twitter.com/yB3w8XI5cA

    — taran adarsh (@taran_adarsh) August 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'सुलतान', 'टायगर जिंदा हैं' आणि 'भारत'सारख्या सिनेमांचे दिग्दर्शक अली अब्बास जफर या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. तर मकबूल खान यांचं दिग्दर्शन असणार आहे. येत्या ११ सप्टेंबरपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. हा सिनेमा २०२० मध्ये १२ जूनला प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.