ETV Bharat / sitara

भावाच्या एंगेजमेंट पार्टीमधील कंगनाचा डान्स व्हिडिओ झाला व्हायरल

author img

By

Published : Nov 9, 2019, 5:19 PM IST

कंगना रानावतच्या भावाचा एंगेजमेंट विधी पार पडला. यावेळी कंगना आणि रंगोली परिवारासोबत मग्न होऊन नाचल्या. या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

कंगनाचा डान्स व्हिडिओ झाला व्हायरल


मुंबई - अभिनेत्री कंगना रानावतने आपले आनंदाचे क्षण कुटुंबीयांसोबत घालवले. तिचा भाऊ अक्षत रानावतचा रितू संगवानसोबत आज एंगेजमेंट विधी पार पडला. यावेळी संपूर्ण रानावत आणि संगवान परिवार उपस्थित होता. कंगनाने यावेळी केलेल्या डान्सचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

कंगनाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून तिच्या टीमने हा व्हिडिओ शेअर केला होता. कंगनासोबत तिची बहिण रंगोली आणि परिवारातील इतर सदस्य पहाडी गाण्यावर ताल धरून नाचताना दिसत आहेत.

कामाच्या पातळीवर विचार करता, थलयवी हा चित्रपट जयललिता यांचा बायोपिक आहे. यात कंगना माजी मुख्यमंत्री आणि तामिळ अभिनेत्री जयललिता यांची भूमिका साकारत आहे.

हॉलिवूडचे सुप्रिद्ध मेकअप आर्टिस्ट जेसन कोलिन्स हे कंगनाच्या लूकवर मेहनत घेत आहेत. त्यांनी यापूर्वी 'कॅप्टन मार्व्हल', 'ब्लेड रनर २०४९' आणि 'हंगर गेम्स' यांसारख्या चित्रपटांसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. आता ते जयललिता यांच्या बायोपिकचा लूक तयार करत आहेत. म्हैसूर येथे या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. विष्णू इंदुरी आणि शैलेश सिंग हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तमिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:

 


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.