ETV Bharat / sitara

कंगना रणौतने घेतले सुवर्ण मंदिराचे दर्शन!! म्हणाली, 'सुंदरता पाहून निशःब्द झाले'

author img

By

Published : May 31, 2021, 6:43 PM IST

Updated : May 31, 2021, 9:04 PM IST

कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्रामवर दोन फोटो आणि स्टोरीजवर चार फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कंगना तिची आई, बहीण रांगोली चंदेल आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह दिसली आहे. कंगना रणौतने अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला भेट दिली.

Kangana Ranaut visited the Golden Temple
कंगना रणौतने केले सुवर्ण मंदिराचे दर्शन

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. सोशल मीडियावर ती सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर नेहमी ती आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करीत असते. नुकतेच तिने आपल्या कुटुंबीयांसोबत अमृतसरमध्ये जाऊन सुवर्ण मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर तेथील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

सोमवारी कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आणि स्टोरीजवर फोटो शेअर केले. या फोटोमध्ये कंगना रणौत तिची आई, बहीण रांगोली चंदेल आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह दिसली आहे. त्यासोबत अभिनेत्रीने लिहिले की, 'आज मी श्री हरमंदिर साहिब सुवर्ण मंदिरात गेले. मी जरी उत्तरेत लहानाची मोठी झाले असले आणि माझ्या कुटुंबातील इतरांनी बऱ्याचवेळा सुवर्ण मंदिराचे दर्शन घेतले असले तरी मी पहिल्यांदाच दर्शन करीत आहे. सुवर्ण मंदिर पाहिल्यानंतर याची सुंदरता आणि भव्यता याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

शनिवारी कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले. यामध्ये आपण पाहू शकता की ती तिच्या कुटुंबातील सदस्यांसह आणि मित्रांसह दिसली आहे आणि सर्वजण खूपच चांगल्या मूडमध्ये दिसत आहेत. कंगना रणौतने लिहिले की, 'कोविडचा काळ सर्वात वेगळ्या अलिप्ततेचा आहे, आज मनालीमध्ये नातेवाईक आणि मित्रांना भेटून खूप बरे वाटले.

कामाचा विचार करता कंगना रणौत आगामी 'थलायवी' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त कंगना 'तेजस' आणि 'धाकड' सारख्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे.

हेही वाचा - महानायक अमिताभ बच्चन यांनाही श्री विठ्ठलच्या भक्तीचा लळा

Last Updated : May 31, 2021, 9:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.