ETV Bharat / sitara

भाजपच्या पराभवाची भविष्यवाणी करणाऱ्या केआरकेला ट्रोलर्सनी घेरले

author img

By

Published : Mar 10, 2022, 4:10 PM IST

वादग्रस्त अभिनेता कमाल आर खान म्हणाला होता की, ''या निवडणूकीत भाजपचा पराभव झाला नाही तर तो पुन्हा भारतात परत येणार नाही.'' दरम्यान देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास जाहीर झाले आहेत. पंजाब वगळता अन्य राज्यात भाजप सरकार स्थापन करणार आहे. त्यामुळे भाजपचा पराभव होईल असे ट्विट केलेल्या केआरकेवर युजर्सनी जबरदस्त प्रहार केला आहे.

केआरके
केआरके

मुंबई - देशातील पाच राज्यांच्या (उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर) विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास जाहीर झाले आहेत. पंजाब वगळता अन्य राज्यात भाजप सरकार स्थापन करणार आहे. इकडे निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध आणि वादग्रस्त अभिनेता कमाल आर खान म्हणाला होता की, जर भाजपचा या निवडणूकीत पराभव झाला नाही तर तो पुन्हा कधीच भारतात परत येणार नाही.

10 मार्चच्या निवडणुकीच्या निकालाच्या सकाळी त्याने एका ट्विटमध्ये म्हटले होते की, ''योगी जी, आज तुमचा शेवटचा दिवस आहे.'' आता भाजप समर्थक केआरकेला या गोष्टींची आठवण करून देत त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत.

KRK चे 10 मार्चचे ट्विट (निवडणूक निकालाचा दिवस)

केआरकेने 10 मार्च रोजी सकाळी 6.39 वाजता ट्विटमध्ये लिहिले, ''गुड मॉर्निंग योगी जी. कसे आहात? आज तुमचा शेवटचा दिवस आहे सर, तुम्हाला आठवण करून द्यावी असे वाटले.''

कमाल आर खान ट्विट
कमाल आर खान ट्विट

KRK चे ट्विट 10 मार्च रोजी सकाळी 9.11 वाजता ट्विट आले. " आदित्य नाथ जी आणि अमित शाह यांचे UP मध्ये पुन्हा विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन.''

KRK ने 17 फेब्रुवारी 2022 रोजी केलेल्या ट्विटमध्ये लिहिले होते, 'आज मी शपथ घेतो की जर योगी जी 10 मार्च 2022 ला पराभूत झाले नाहीत, तर मी भारतात परत येणार नाही! जय बजरंग बली !

कमाल आर खान ट्विट
कमाल आर खान ट्विट

आता या ट्विटवर केआरके इतका ट्रोल होत आहे की त्याला श्वास घेणे कठीण झाले आहे. एका यूजरने लिहिले की, 'भाऊ, तुम्ही म्हणालात की योगी बाबा पुन्हा यूपीमध्ये आले तर तुम्ही ट्विटर सोडू. जर तुम्ही खरोखरच माणूस असाल तर तुमच्या बोलण्याला जागा.''

दुसर्‍या यूजरने लिहिले की, ''संध्याकाळपर्यंत या इडियटचे विधान बदलेल. आपण ते पाहू शकता. लोक या मूर्खाच्या मागे का लागतात हे मला कळत नाही.''

आता केआरकेने केली भविष्यवाणी

आता आपला सूर बदलत केआरकेने ट्विट केले आणि लिहिले, 'भविष्यवाणी 65, सर्व काही सहन करूनही भारतीयांनी पाच राज्यांमध्ये भाजपला मत दिले तर २०२४ मध्येही भाजप जिंकेल. नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार आहेत.''

हेही वाचा - 'कच्चा बदाम' फेम गायक भुवन बड्याकरने मागितली माफी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.