ETV Bharat / sitara

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी गणपती बाप्पाचा एक दिवस आधीच मुक्काम

author img

By

Published : Aug 20, 2020, 4:46 PM IST

दरवर्षी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी शिल्पा पती राज कुंद्रा सोबत गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायला येते. पण यंदा राज्य सरकारने शक्यतो गणपती कार्यशाळेतून लवकर बाप्पा घरी नेण्याचे आवाहन केल्याने ती आज एक दिवस आधी बाप्पाला घरी घेऊन गेली.

Ganeshotsav 2020: Shilpa Shetty Brings Home Ganpati as She Gears Up for Ganesh Chaturthi
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी गणपती बाप्पाचा एक दिवस आधीच मुक्काम

मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टी, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला वाजत गाजत घरी घेऊन जाण्यासाठी लालबागला आली होती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अत्यंत कमी लोकांसह ढोल-ताशे न वाजवता आणि राज्य सरकारच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करत शिल्पाने लाडक्या बाप्पाला घेऊन घर गाठले.

Ganeshotsav 2020: Shilpa Shetty Brings Home Ganpati as She Gears Up for Ganesh Chaturthi
गणरायाला घरी घेऊन जाताना शिल्पा शेट्टी...


शिल्पा शेट्टी लालबागच्या राजाची भक्त आहे. त्यामुळे तिच्या घरी बसणारा बाप्पा हा राजाचीच छोटी प्रतिकृती असते. लालबागच्या राजाची मूर्ती घडवणारे मूर्तीकारच शिल्पाच्या गणपतीची मूर्ती घडवतात. खर तर दरवर्षी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी शिल्पा पती राज कुंद्रा सोबत गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायला येते. पण यंदा राज्य सरकारने शक्यतो गणपती कार्यशाळेतून लवकर बाप्पा घरी नेण्याचे आवाहन केल्याने ती आज एक दिवस आधी बाप्पाला घरी घेऊन गेली.

शिल्पा शेट्टी लाडक्या गणपती बाप्पाला घरी घेऊन जाताना...

शिल्पाने यावेळी माध्यमाच्या प्रतिनिधीसह 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष केला. यंदा तिच्या घरच्या गणपतीच हे 11 वे वर्ष आहे. यंदा गणेशोत्सवावर देखील कोरोनाच संकट कायम आहे. त्यामुळे मुंबईतील लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा मूर्ती न बसवण्याचा निर्णय घेता आरोग्ययज्ञ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - ईशान खट्टरच्या हातात एकाहून एक सरस चित्रपट, सर्वोत्तम कामगिरीसाठी सज्ज

हेही वाचा - दिग्दर्शक ओम राऊत प्रभासला घेऊन बनवणार भव्यदिव्य थ्रीडी सिनेमा ‘आदीपुरूष’!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.