ETV Bharat / sitara

केंद्र सरकारने ड्रग्स मुक्त अभियान राबवावे - सुप्रिया सुळे

author img

By

Published : Sep 29, 2020, 5:51 PM IST

बॉलिवूडमधील काही कलाकार ड्रगचे सेवन करीत असल्याबद्दल सध्या मोठे काहूर उठले आहे. याचे राजकीय वादळ निर्माण करण्याचाही प्रयत्न होत आहे. ड्रगबद्दल जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

supriya-sule
सुप्रिया सुळे

पुणे - राज्यात जसे तंबाखू मुक्त अभियान राबवले जाते तसेच केंद्र सरकारने ड्रग्समुक्त अभियान राबवावे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सध्या सुरू असलेल्या ड्रगच्या बॉलिवूड कनेक्शनबद्दल त्या बोलत होत्या.

केंद्र सरकारने ड्रग्स मुक्त अभियान राबवावे - सुप्रिया सुळे

बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शनबद्दल बोलताना सुप्रिया म्हणाल्या, ''केवळ तीन महिलांना चौकशीसाठी बोलवून काही साध्य होणार नाही.. तर मुळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे, असे फक्त भारतातच होते असे नाही, तर संपूर्ण जगासमोर हा प्रश्न आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयात, विद्यार्थीदशेत अशा गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्याची खरी आवश्यकता आहे. या गोष्टीकडे लक्ष दिल्यास तरुण वर्ग ड्रग्ससारख्या वस्तूंपासून दूर राहील.''

राज्यसरकारमधील काही नेत्यांना नोटीस आली आहे त्याबद्दल विचारले असता, सुप्रिया सुळे म्हणाल्या, ''मला, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आणि सदानंद सुळे यांना निवडणूक आयोगाची नोटीस आली आहे. त्या नोटीसीला आम्ही सविस्तर उत्तर देऊ. अशीच एक नोटीस वर्षभरापूर्वी (ईडीची) आली होती. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले होते. तशीच ही नोटीस आहे..त्यांनी त्यांचे काम केले आता आम्ही आमचे काम करू.''

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.