ETV Bharat / sitara

बहिणीला भेटण्यासाठी ४ वर्षाच्या सुशांतने शाळेला मारली होती दांडी...!

author img

By

Published : Jul 27, 2020, 6:56 PM IST

Updated : Jul 28, 2020, 8:05 PM IST

सुशांतसिंह राजपूतची बहिण श्वेतासिंग किर्ती हिने भावाच्या लहानपणीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. ४ वर्षे वयाच्या सुशांतने शाळेतून पळून जाऊन बहिणीची कशी भेट घेतली होती याचा सहसी किस्साही तिने सांगितलाय.

Sushant sister
सुशांतसिंह राजपूतची बहिण श्वेतासिंग

मुंबई : सुशांतसिंह राजपूतची बहिण श्वेतासिंग किर्ती हिने आपल्या भावाच्या लहानपणीच्या आठवणी सांगणारी एक दीर्घ पोस्ट लिहिली आहे. शाळेत असताना सुशांतने कसा साहसी प्रयत्न केला होता त्याबद्दल श्वेताने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे.

''भाईची नर्सरी आणि माझा एलकेजी क्लास एकाच इमारतीत होता, त्यामुळे एक वर्ष आम्ही चांगले मॅनेज केले. पण नंतर माझा युकेजी क्लास दुसऱ्या बिल्डिंगमध्ये होता आणि त्याचा एलकेजी क्लास त्याच बिल्डिंगमध्ये होता. एके दिवशी दुपारी जेवणानंतर माझ्या वर्गामध्ये भाईला पाहिले. आम्ही तेव्हा फक्त 4/5 वर्षांचे होतो.''

''त्याला पाहून मला धक्काच बसला आणि आनंदही झाला. मी त्याला विचारले की तू इथे कसा आलास, कारण त्याच्या शाळेची इमारत किमान अर्धा किलोमिटर लांब होती. त्याने सांगितले की त्याला करमत नाही आणि त्याला माझ्यासोबत राहायचे आहे. त्याच्या इमारतीतील सुरक्षा रक्षकाला त्याने कसे चुकवले असेल, तसेच तो इतक्या लांब चालत आला आणि आमच्या इमारतीच्या सुरक्षा रशकाच्या नाकाखालून तो आत आला. त्यानंतर त्याने आमचा वर्ग शोधून काढला आणि मला शोधण्यात तो किती साहसी व धैर्यवान होता या विचारात मी पडले,'' असे श्वेताने लिहिले आहे.

त्याला चिंता वाटू लागल्यामुळे सुशांतने शाळेतून चक्क पळ काढला होता.

''त्याचे शाळेतून पळून जाण्याचे कारण मला व्यावहारिक वाटले. कारण मी समजू शकत होते की, जेव्हा मला पहिल्यांदा शाळेत टाकले तेव्हा मी रडत होते आणि रडून मी वडिलांना सोडून नका जाऊ म्हणत होते. कुटुंबापासून पहिल्यांदाच बाजूला जात अनोळखी लोकांच्यात गेल्यामुळे तसे वाटणे सांहजिक होते. ५ वर्षे वयाची मी त्याची बहिण म्हणून त्याला विश्वास दिला की मी त्याच्यासोबत आहे.''

"सुरुवातीला मी माझ्या मित्रांच्या मदतीने त्याला वर्गात लपवण्याचा प्रयत्न केला. पण हजेरी घेताना माझ्या वर्गशिक्षकाच्या ही गोष्ट ध्यानात आली. मी त्यावेळी घाबरले होते. परंतु भावाला वाचवण्यासाठी मी उठले आणि म्हणाले त्याला बरं वाटत नाही आणि शाळा सुटेपर्यंत तो माझ्यासोबत बसू देत. माझ्या शिक्षकाने आश्चर्य व्यक्त केले आहे मी खूश झालो. परंतु नियमानुसार काही वेळाने त्याला त्याच्या इमारतीत पाठवले गेले. पण दरम्यान आम्ही खूप मजा केली आणि त्याची चिंता दूर झाली.", असे श्वेताने पुढे सांगितले.

श्वेताने तिच्या पोस्टमध्ये सुशांतच्या जन्मामागील कथादेखील शेअर केली आहे.

हेही वाचा - ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोनावर मात

"मला माझ्या कुटुंबातील सदस्यांकडून नेहमीच सांगण्यात आले आहे की, आई आणि वडिलांना मुलगा हवा होता. कारण मम्माला पहिला एक मुलगा झाला होता. मात्र, दीड वर्षाचा असताना तो तिने गमावला होता. त्यानंतर दिवाळीला माझा जन्म झाला. त्यावेळी मम्मा खूप खूश झाली होती. ती मला लक्ष्मीजी असे म्हणायची. त्यानंतरच्या एका वर्षात माझा छोटा भाऊ जन्मला. अगदी सुरुवातीपासूनच तो एक मोहक होता, त्याने आपल्या सुंदर स्मित आणि चमकत्या डोळ्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले.", असे श्वेताने पुढे लिहिले आहे.

श्वेतासिंग किर्तीने आपल्या लहान भावाच्या असंख्य गोष्टी पोस्टमध्ये लिहिल्या आहेत. तिचे भावावर प्रचंड प्रेम होते आणि सुशांतही तिच्यावर खूप प्रेम करत होता. त्यांच्या नात्याबद्दल तिने बरेच लिहून आपल्या भावाच्या आठवणींना उजाळा दिलाय.

Last Updated : Jul 28, 2020, 8:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.