ETV Bharat / sitara

ऐश्वर्याच्या एक्स बॉयफ्रेंडला समोर पाहताच अभिषेकनं केलं असं काही, पाहा फोटो

author img

By

Published : Sep 9, 2019, 5:26 PM IST

नुकतंच भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूच्या सत्कारासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका सोहळ्यात बॉलिवूडकरांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. यावेळी विवेक ओबेरॉय आपल्या कुटुंबासोबत तर अभिषेक अमिताभ यांच्यासोबत याठिकाणी आला होता

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन

मुंबई - बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांच्या रिलेशनशिपविषयीच्या चर्चा ब्रेकअपनंतर इतक्या वर्षांनं आजही सुरू असतात. नुकतंच ऐश्वर्याबद्दलच्या एका वादग्रस्त ट्विटमुळे विवेक चांगलाच ट्रोल झाला होता. यानंतर आता अभिषेकनं केलेल्या एका गोष्टीमुळं त्याकडे सगळ्यांच्याच नजरा खिळल्या.

नुकतंच भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूच्या सत्कारासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका सोहळ्यात बॉलिवूडकरांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. यावेळी विवेक ओबेरॉय आपल्या कुटुंबासोबत तर अभिषेक अमिताभ यांच्यासोबत याठिकाणी आला होता. यावेळी अभिषेकनं विवेकची गळाभेट घेतली. त्यांच्या या भेटीनं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं.

अभिषेकनं घेतली विवेकची गळाभेट
अभिषेकनं घेतली विवेकची गळाभेट

काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्याबाबत विवेकनं केलं होतं हे वादग्रस्त ट्विट -

17 व्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रसारमाध्यमांनी दाखवलेले एक्झिट पोल आणि वास्तवता याबद्दलचं एक मीम विवेकनं शेअर केलं होतं. याचा संबंध त्याने थेट ऐश्वर्यासोबत जोडला होता. त्याने या मीममध्ये तीन फोटो शेअर केले होते. पहिल्या फोटोत ऐश्वर्या राय सलमान खानसोबत होती आणि त्याखाली ओपिनियन पोल असे लिहिले आहे. दुसऱ्या फोटोत विवेक आणि ऐश्वर्या होते, त्या फोटोखाली एक्झिट पोल असे लिहिले. त्यानंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या आणि अराध्या यांचा फोटो टाकत त्या फोटोखाली रिझल्ट असे लिहिले होते. याच ट्विटमुळे विवेक प्रचंड ट्रोल झाला होता.

Intro:Body:

sitra


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.