ETV Bharat / science-and-technology

Twitter Blue Tick :भारतात ट्विटरच्या ब्लू टिक सबस्क्रिप्शनला सुरूवात, शुक्ल रचना जाणून घ्या

author img

By

Published : Feb 9, 2023, 5:15 PM IST

ट्विटरने भारतात ब्लू टिक सबस्क्रिप्शन सुरू केले आहे. यात ट्विटरकडून मोबाइल वापरकर्ते आणि वेब वापरकर्त्यांसाठी स्वतंत्र मासिक शुल्क ठेवण्यात आले आहे. व्हेरिफिकेशनसह वापरकर्ते त्यांच्या ब्लू टिक सेवेसाठी बराच काळ वाट पाहत होते. काय आहे नक्की नुद्दा वाचा पूर्ण बातमी..

Twitter Blue Tick Fee
ट्विटर ब्लू टिक

नवी दिल्ली : ट्विटरने भारतात ब्लू टिक सुविधा सुरू केली आहे. यात ट्विटरकडून एँड्रॉइड आणि आयओएस मोबाईल उपकरणांवर 900 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे, वेब वापरकर्त्यांना ट्विटर ब्लू टिकसाठी प्रति महिना 650 रुपये शुल्क द्यावे लागेल. कंपनीने पुष्टी केली आहे की ट्विटर वेबवर पडताळणीसह त्याच्या ब्लू सेवेसाठी मासिक तसेच वार्षिक योजना ऑफर करते. जर कोणत्याही वापरकर्त्याने नियमितपणे पेमेंट केले नाही तर ते ब्लू चेकमार्क/ब्लू टिक गमावतील.

भारत, ब्राझील, इंडोनेशिया : ट्विटरकडून ब्लू टिक आता भारत, ब्राझील आणि इंडोनेशियामध्ये विस्तारित करण्यात आले आहे. इलॉन मस्क द्वारे चालवले जाणारे ट्विटर, भारतात दर वर्षी 6,800 रुपयांची सवलत देणारी वार्षिक योजना देखील ऑफर करत आहे. जे प्रति महिना अंदाजे 566.67 रुपये आहे. भारतात लॉन्च झाल्यामुळे, ट्विटर ब्लू टिक आता यूएस, कॅनडा, जपान, यूके आणि सौदी अरेबियासह 15 जागतिक बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने आपली ब्लू सर्व्हिस सबस्क्रिप्शन सेवा आणखी सहा देशांमध्ये विस्तारित केली.

डिसेंबरमध्ये ब्लू सबस्क्रिप्शन : गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, ट्विटरने त्याची ब्लू सबस्क्रिप्शन सेवा पुन्हा सुरू केली. ज्याची किंमत जागतिक स्तरावर एँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी 8 डॉलर आणि आयफोन मालकांसाठी 11 डॉलर आहे. ट्विटरने आता यूएसमधील ब्लू टिक सदस्यांना 4,000 वर्णांपर्यंतचे ट्विट तयार करण्याची परवानगी दिली आहे. ट्विटर ब्लू सदस्यांना त्यांच्या होम टाइमलाइनमध्ये 50 टक्के कमी जाहिराती देखील दिसतील.

कस्टम अ‍ॅप चिन्ह : निळ्या चेकमार्कसह, ट्विटर ब्लू वैशिष्ट्य ग्राहकांना त्यांचे ट्विटरवरचे अनुभव सानुकूलित करण्याचा मार्ग देते. ज्यात कस्टम अ‍ॅप चिन्ह, सानुकूल नेव्हिगेशन, शीर्षलेख, पूर्ववत ट्वीट्स, लांब व्हिडिओ अपलोड आणि बऱ्याच काही गोष्टींचा समावेश आहे. मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने ट्विटर व्हेरिफिकेशन फॉर ऑर्गनायझेशन नावाची एक नवीन सेवा देखील सुरू केली आहे. ट्विटरवरील व्यावसायिक संस्थांसाठी ही सेवा अधिकृत व्यवसाय खात्यांवर सुवर्ण चेकमार्क जोडते. ट्विटरने व्यवसायांना सोन्याचा बॅज टिकवून ठेवण्यासाठी दरमहा 1,000 डॉलर भरण्यास सांगितले आहे. जे ब्रँड आणि संस्था पैसे देत नाहीत ते चेकमार्क गमावतील.

हेही वाचा : Twitter Fixes Bug : मस्कने ट्विट उपलब्ध नसलेल्या बगचे केले निराकरण, वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.