ETV Bharat / science-and-technology

Microsoft Services Outage : मायक्रोसॉफ्टच्या आऊटलूक, टीम्ससह अनेक सेवा ठप्प; यूजर्सला फटका बसल्याने संताप

author img

By

Published : Jan 25, 2023, 4:35 PM IST

मायक्रोसॉफ्टच्या अनेक सेवा बुधवारी ठप्प झाल्याने यूजर्सचा चांगलाच संताप झाला. मायक्रोसॉफ्ट 365, आऊटलूक, मायक्रोसॉफ्ट टीम्स या सेवा ठप्प झाल्याने सोशल माध्यमात यूजर्सनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट टीम्स, आऊटलूक यासारखे ट्रेंड सोशल माध्यमात सुरू झाले.

Microsoft Services Outage
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - मायक्रोसॉफ्टच्या अनेक सेवा ठप्प झाल्याने बुधवारी यूजरमध्ये हाहाकार उडाला. देशभरात मायक्रोसॉफ्टच्या अनेक सेवांचा यूजर वापर करत आहेत. मात्र मायक्रोसॉफ्टच्या सेवा ठप्प झाल्याने यूजर्सचा चांगलाच संताप झाला. मायक्रोसॉफ्टच्या टीम्स, आऊटलूक आणि मायक्रोसॉफ्ट 365 या सेवा ठप्प झाल्या. याबाबत मायक्रोसॉफ्टने तात्काळ आपल्या साईटवर याबाबत सेवा सुरळीत करत असल्याबाबतची माहिती दिली. मायक्रोसॉफ्टने सेवा सुरळीत करत असल्याबाबतचीही माहिती यावेळी दिली आहे.

देशभरात मायक्रोसॉफ्टचे करोडो यूजर : अमेरिकन टेक कंपनी मायक्रोसॉफ्टच्या अनेक सेवांचा करोडो यूजर वापर करतात. मात्र मायक्रोसॉफ्टच्या हजारो वापरकर्त्यांना बुधवारी चांगलाच फटका बसला. टीम्स, आऊटलूक, टीम्स, मायक्रोसॉफ्ट 365 या सेवा ठप्प झाल्या. त्यामुळे भारतातील हजारो वापरकर्त्यांना या सेवा ठप्प झाल्यांचा फटका बसला. हजारो वापरकर्त्यांनी याबाबत ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यामुळे काही क्षणांतच मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि #Outlook या हॅशटॅगने सोशल माध्यमात ट्रेंड केला.

मायक्रोसॉफ्टने चौकशी करत असल्याची दिली माहिती : आऊटलूक, टीम्स आणि मायक्रकोसॉफ्ट 365 या सेवा ठप्प झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. ट्विटर आणि सोशल माध्यमात याबाबतचा मायक्रोसॉफ्ट टीम आणि आऊटलूक सारखे हॅशटॅग ट्रेंड झाला. त्यामुळे मायक्रोसॉफ्टने अधिकृत स्टेटस अपडेट करत आम्ही मायक्रोसॉफ्ट 365 सेवा ठप्प झाल्याच्या कारणांचा शोध घेत असल्याचे जाहीर केले.

मायक्रोसॉफ्टने काढले 10 हजार कर्मचारी : जगभरात आलेल्या मंदिच्या फटक्यामुळे मायक्रोसॉफ्टने आपल्या 10 कर्मचाऱ्यांची तपात करण्याचे ठरवले आहे. या कर्मचाऱ्यांना काढल्यामुळे मायक्रोसॉफ्टवर जगभरातून टीका होत आहे. त्यानंतर आता मायक्रोसॉफ्टच्या आऊटलूक, मायक्रोसॉफ्ट 365 आणि टीम्स या सेवा ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे मायक्रोसॉफ्टच्या यूजरनी संतापर व्यक्त केला आहे.

काही क्षणात सोशल माध्यमात कंपनी ट्रेंड : मायक्रोसॉफ्टच्या सेवा ठप्प झाल्याने जगभरातील यूजरमध्ये हाहाकार उडाला. त्यामुळे या यूजर्सनी आपल्या भावना सोशलमाध्यमातून व्यक्त केल्या. त्यामुळे काही क्षणात सोशल माध्यमात मायक्रोसॉफ्ट 365, टीम्स आणि आऊटलूकबाबत अनेक कमेंट आल्या. काही यूजर्सनी मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि आऊटलूक यासारखे हॅशटॅग सुरू केले. त्यामुळे काही क्षणातच सोशल माध्यमात मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि आऊटलूकचा ट्रेंड सुरू झाला. सध्या मायक्रोसॉफ्टच्या सेवा ठप्प झाल्याने अनेक यूजर्सना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे या युजर्सकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - Scan Boarding Pass : मुंबई विमानतळावर तिकीट बोर्डिंग पास स्कॅन होणार, प्रवाशांचा वेळ वाचणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.