ETV Bharat / science-and-technology

ISRO launched LVM 3 : इस्रोने भारताचे सर्वात मोठे एलव्हीएम - 3 रॉकेट केले प्रक्षेपित, एकाच वेळी पाठवले 36 उपग्रह!

author img

By

Published : Mar 26, 2023, 10:55 AM IST

Updated : Mar 26, 2023, 11:02 AM IST

इस्रोने रविवारी एकाच वेळी तब्बल 36 उपग्रह प्रक्षेपित केले. एलव्हीएम - 3 या तीन स्टेज रॉकेट द्वारे हे प्रक्षेपण करण्यात आले.

ISRO
इस्रो

श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने रविवारी त्यांचे नवीनतम मिशन एलव्हीएम 3 - एम 3 वन वेब इंडिया 2 टू लो अर्थ ऑर्बिट (LVM3 - M3 One Web India - 2 To low earth orbit) लाँच केले. एलव्हीएम - 3 (LVM3) चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी 9 वाजता करण्यात आले. अंतराळातील भारताचे हे नवे यश आहे. याद्वारे इस्रोने एकाच वेळी तब्बल 36 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत.

  • #WATCH आंध्र प्रदेश: भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (ISRO) ने 36 उपग्रहों को ले जाने वाला भारत का सबसे बड़ा LVM3 रॉकेट श्रीहरिकोटा के सतीश धवन अंतरिक्ष केंद्र से लॉन्च किया।

    (सोर्स: ISRO) pic.twitter.com/CnMreq8HVc

    — ANI_HindiNews (@AHindinews) March 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इस्रोने एकाच वेळी 36 उपग्रह प्रक्षेपित केले : अधिकार्‍यांनी सांगितले की, एलव्हीएम 3, 43.5 मीटर उंच आणि 643 टन वजनी आहे. ते वनवेबच्या 36 जेन 1 उपग्रहांचा अंतिम टप्पा वाहून नेण्यासाठी दुसऱ्या लॉन्च पॅड रॉकेट पोर्टवरून प्रक्षेपित करण्यात आले आहे. ब्रिटनच्या नेटवर्क एक्सेस असोसिएट्स लिमिटेडने लो अर्थ ऑर्बिटमध्ये 72 उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोसोबत करार केला आहे. यापूर्वी वनवेब ग्रुप कंपनीचे 36 उपग्रह 23 ऑक्टोबर 2022 रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते.

एलव्हीएम - 3 हे तीन स्टेज रॉकेट : मिळालेल्या माहितीनुसार, एलव्हीएम - 3 हे तीन स्टेज रॉकेट आहे. यामध्ये पहिला टप्पा द्रव इंधन आहे. त्याचे दोन स्ट्रॅप ऑन मोटर्स सॉलिड इंधनावर चालतात. दुसरे द्रव इंधन आणि तिसरे क्रायोजेनिक इंजिन आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की रॉकेट टेक ऑफ झाल्यानंतर अवघ्या 19 मिनिटांत उपग्रह वेगळे करण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि 36 उपग्रहांचे पृथक्करण टप्प्याटप्प्याने होईल. यापूर्वी, वनवेब सॅटेलाइट कम्युनिकेशन्स कंपनीचे सोशल मीडिया हँडल आणि या मोहिमेतील एका सहभागीने ट्विटरवर सांगितले की, या प्रक्षेपणासाठी आमचा गोल्डन 'हॅलो वर्ल्ड' मिशन पॅच या वर्षीच्या जागतिक कव्हरेजची सुरुवात आहे. वनवेबने यूके आणि भारतीय अंतराळ उद्योगांमधील सहकार्याचे महत्त्व देखील नोंदवले आहे.

हेही वाचा : IISc Research On 6G Technology : आयआयएससीचे संशोधक बनवत आहेत 6G तंत्रज्ञानाला सक्षम बनवणारा अँटेना

Last Updated : Mar 26, 2023, 11:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.