Instagram removes 'daily time limit' : इंस्टाग्रामने हटवले डेली लिमिट फीचर

author img

By

Published : Feb 23, 2022, 12:00 PM IST

Instagram

2018 मध्ये, इंस्टाग्रामने दैनंदिन वेळ मर्यादा सेट करण्यासाठी अॅपमध्ये पर्याय दिले होते. ती वेळ मर्यादा संपल्यावर ( set a daily time limit ) याचा रिमांडर पाठवावा. सोशल मीडियाचा वापर ( social media usage ) कमी करणाऱ्यांसाठी हे उपयुक्त आहे.

वॉशिंग्टन : सोशल मीडिया टेक इंस्टाग्रामने अॅपचा दैनंदिन वापर 30 मिनिटांपेक्षा कमी करण्याचा पर्याय काढून टाकला आहे. नवीन अॅप अपडेटनंतर, 'दैनिक वेळ मर्यादा सेट करा' ( Set daily time limit ) मेनू कार्ड पॉप अप होत होते. आणि यूजर्सना त्याची किती वेळ असावी हे निवडता येते. यात रेडिओ बटण दिले असून, जास्तीत जास्त यूजर्सना मर्यादा निवडण्यासाठी तीन तास दिले आहेत.

2018 मध्ये, इंस्टाग्रामने दैनंदिन वेळ मर्यादा सेट करण्यासाठी अॅपमध्ये पर्याय दिले होते. जेव्हा ती वेळ मर्यादा संपल्यावर ( set a daily time limit ) याचा रिमांडर पाठवावा. सोशल मीडियाचा वापर ( social media usage ) कमी करणाऱ्यांसाठी हे उपयुक्त आहे. यूजर्स दिवसातून दहा किंवा अगदी पाच मिनिटांपर्यंत वेळ निवडू शकतात.

आता यूजर्सना वेळ करता येईल सेट

यूजर्स इच्छा असल्यास त्यांची मर्यादा सेट करू शकतो. परंतु अॅपमधील अतिरिक्त पॉपअप 10-मिनिटापेक्षा अधिक वेळ "no longer supported" म्हणून येतात. यानंतर यूजर्सना उपलब्ध असलेली नवीन मर्यादा 30 मिनिटे, 45 मिनिटे, एक तास, दोन तास आणि तीन तास अशी असेल. Instagram ने त्याचे 'टेक अ ब्रेक' ( Take a Break ) वैशिष्ट्यानंतर काही महिन्यांतच हा बदल आला आहे.

इंस्टाग्रामने अॅपलला दिला दोष

द व्हर्जने नमूद (The Verge notes ) केल्याप्रमाणे, 'टेक अ ब्रेक' 'Take a Break' चाचणी सुरू असताना, इंस्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी म्हणाले की "तुम्ही अॅप वापरताना तुमच्यासाठी सर्वात चांगले काय आहे याची आम्हाला माहिती आहे." या महिन्याच्या सुरुवातीला मेटाने निराशाजनक तिमाही कमाईनंतर हा बदल झाला आहे. कंपनीने 2022 च्या पहिल्या तिमाहीत USD 30 बिलियनचा तोटा झाला. Mac Rumours च्या अहवालानुसार, Meta ने याचा दोष अंशी अॅपलने गोपनीयता सुधारण्यासाठी केलेल्या उपाययोजनांना देत आहे.

हेही वाचा - Galaxy Tab S8 : Samsung ने Galaxy Tab S8 सिरीज केली लॉन्च

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.