नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावानं जारी करण्यात आलेले G20 डिनरचं आमंत्रण पत्रिकेत "भारताचे राष्ट्रपती" असा उल्लेख करण्यात आलाय. त्यावरून विरोधक सरकारवर टीका करत आहे. त्यामुळं केंद्र सरकार देशाचं नाव बदलून भारत करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
सामूहिक भूतकाळाचा अभ्यास करण गरजेचं- देशाचा पूर्वइतिहास पाहिल्यास इंग्रजांनी देशाचं नाव 'इंडिया' ठेवलं होतं. हे नाव वसाहतवादाचं प्रतिक मानलं जातं. देशाच्या 'इंडिया' नावावर नकारात्मक प्रचार केला जात असताना, आपल्या सामूहिक भूतकाळाचा अभ्यास करण गरजेचं आहे. सिंधू संस्कृती ही जगातील तीन प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. भारत नावाची मुळं ख्रिश्चन युगाच्या 3 हजार वर्षांपूर्वी विकसित झालेल्या संस्कृतीत आहेत.
सिंध नदीचा उच्चार हिंद - 'स' ध्वनीनं सुरू होणारे शब्द पर्शियन लोकांच्या त्यांच्या भाषेत दुर्मिळ होते. त्यामुळं प्राचीन पर्शियन लोकांनी सिंध नदीचा उच्चार हिंद असा केला. त्यानंतर ग्रीकांनी त्याचा उच्चार सिंधू असा केला. सुमारे 440 ईसापूर्व, ग्रीक इतिहासकार हेरोडोटस यांनी सिंधूच्या पाण्यानं भिजलेल्या भूमीला 'हिंदी के छोरे' म्हणजे सिंधू भूमी असं संबोधलंय.
- भारताच्या इतिहासाचे जनक म्हणून लोकप्रिय झालेले ग्रीक विचारवंत मेगॅस्थेनिस यांनी 300 BCE मध्ये त्यांच्या कामाचं शीर्षक ‘इंडिका’ असं ठेवलं होतं. त्यावेळी ब्रिटन नावाचा देश नव्हता. युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन अस्तित्वात आल्यानंतर 1707 मध्ये "ब्रिटिशर" हा शब्द लोकप्रिय झाला.
भारत हे नाव लोकांचं प्रतिक- हे सत्य असताना आपल्या देशाचं इंडिया असं नामकरण करण्याचं श्रेय आपण इंग्रजांना कसं देऊ शकतो? इंग्रज येथे येण्यापूर्वी किमान दोन हजार वर्षे ही भूमी इंडिया म्हणून जागतिक स्तरावर लोकप्रिय होती. एक देश म्हणून देशाला गौरवशाली इतिहास आहे. सिंधू संस्कृतीत रुजलेले भारत हे नाव, ज्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. हे 140 कोटी लोकांच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक वारशाचं प्रतीक आहे.
भारत हा शब्द प्राचीनकाळापासून..'भारत' हा शब्द आसेतु हिमाचलशी कसा जोडला गेला, हे लक्षात घेणे देखील मनोरंजक आहे. भारत हा शब्द ऋग्वेद काळात लोकांच्या कुळासाठी वापरला जात असे. दहा राजांच्या ऋग्वेदिक युद्धाचा विजेता राजा सुदास हा भरत वंशातील होता. त्या काळात भरतांबरोबरच पुरू, यदु, तुर्वसा वगैरे कुळेही उपस्थित होती. आपण पाहतो की, महाभारत, विष्णु पुराणात 'भारत भूमी', 'भारत वर्ष' या शब्दांचा वापर प्रदेश दर्शविण्यासाठी केला गेला होता. ऐतिहासिकदृष्ट्या, ओरिसाची राजधानी भुवनेश्वरजवळ सापडलेल्या लोकप्रिय हस्ती गुंफा शिलालेखात 'भारत वर्ष' हा शब्द वापरला गेला आहे.
- प्राचीन कलिंग राजा खारावेलाच्या नावानं कोरलेल्या शिलालेखात असं म्हटलं आहे की, खारावेलानं आपलं सैन्य 'भारतवर्ष' ताब्यात घेण्यासाठी पाठवलं होतं. त्यानुसार, 'भारत वर्षा' हे गंगेच्या मैदानानं वेढलेलं भौगोलिक क्षेत्र होतं. त्याचप्रमाणं, 'भारत वर्ष' या शब्दाचा इतिहास इसवी सनपूर्व दुसरे शतक तसंच इसवी सन पूर्व 1 ले शतकादरम्यान झाल्याचं शिलालेखांवरून समजतं.
इंडिया म्हणजे भारत- राज्यघटनेच्या पहिल्या अनुच्छेदात स्पष्टपणे लिहिले आहे की, “इंडिया म्हणजे भारत…” त्यामुळे देशाच्या नावावरूनच वाद निर्माण होणे अत्यंत दुर्दैवी आहे. सत्ताधारी पक्षाला इंडिया नावावर काही आक्षेप असल्यास ते भारत हे नाव वापरू शकतात. त्यात कोणतीही अडचण येऊ शकत नाही. मात्र केंद्रानं हे नाव पूर्णपणे काढून टाकण्याचा संकल्प केल्यास त्यांचं जनता स्वागत करणार नाही. येत्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी खूप विचारविनिमय करून आपल्या आघाडीचं नाव INDIA ठेवलं आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांनी इंडिया नाव विसरुचा नारा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमागे विरोधकांवर मात करण्याशिवाय दुसरा कोणता हेतू दिसत नाही.
देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न- जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जागतिक नेते दिल्लीत जमणार आहेत, अशा वेळी अशा अनावश्यक वादामुळं देशाच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही का? संसदेचं विशेष अधिवेशन केवळ देशाचं नामांतर करण्यासाठीच असेल, तर या मुद्द्यावरून होणारे वाद-प्रतिवाद देशाच्या प्रतिमेवर, लोकशाही प्रश्नचिन्ह निर्माण करणारे नाहीत का? असा प्रश्न निर्माण होतोय.
प्रगतीशील धोरणांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज- इंडिया नाव आपल्या तमाम देशवासीयांच्या भावनांशी जुडलेलं आहे, हे सर्वांनी समजून घेण्याची वेळ आली आहे. विकसित भारत साध्य करण्यासाठी केंद्र व राज्यांनी मिळून 'टीम इंडिया' म्हणून काम करायला हवं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. सर्वांनी एकत्रितपणे प्रगतीशील धोरणांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हा पंतप्रधानांच्या संदेशाचा मुख्य मुद्दा होता. त्यामुळं देशाचं नामकरण करण्याच्या कोणत्याही घाईमुळे 'टीम इंडिया'च्या आत्म्याला मोठा धक्का बसेल.
- लेखक- शैलेश निम्मगड्डा
हेही वाचा -