या फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी

author img

By

Published : Feb 1, 2019, 7:15 PM IST

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपला आहारात संतुलित असणे गरजेचे आहे. तसेच यासोबत व्यायामाचे नियोजन करणेही आवश्यक असते.

अनेकजण वाढलेल्या वजनाने त्रस्त असतात. वजन कमी करण्यासाठी ते वेगवेगळे प्रयत्नही करत असतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपला आहारात संतुलित असणे गरजेचे आहे. तसेच यासोबत व्यायामाचे नियोजन करणेही आवश्यक असते. परंतु, याव्यतिरिक्त काही गोष्टी तुमचं वाढलेले वजन कमी करू शकतात.

अनेकांना दररोज व्यायाम करण्याचा कंटाळा येतो. परंतु, कोणताही व्यायाम न करता तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. तुम्हाला माहीत आहे का? काही पदार्थ खाण्याऐवजी त्यांचा गंध घेतल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते. हा निष्कर्ष एका संशोधनामधून स्पष्ट झाला आहे. या फळांचा फक्त गंधच आपल्या शरीरातील फॅट्स कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. चला तर मग जाणून घेऊया या फळांविषयी...

हिरवे सफरचंद आणि केळी -

वजन वाढलेल्या व्यक्तींनी भूक लागल्यावर हिरवे सफरचंद आणि केळी यांचा वास घेतला तर त्यांचे वजन कमी होण्यास मदत होते. या फळांना असणारा नैसर्गिक गोड गंध भूक भागवण्यासाठी मदत करतो, असे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे.

लसूण -

२०१२ मध्ये फ्लेवर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, एखाद्या पदार्थाला उग्र गंध येत असेल तर कोणतीही व्यक्ती त्या पदार्थाचा छोटा घास घेते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी बोल्ड फ्लेवर्स आणि उग्र गंध असणारे मसालेदार पदार्थ फायदेशीर ठरतात. लसणाशिवायही अनेक मसाल्याचे पदार्थ वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहेत.

ऑलिव्ह ऑइल -

जर्मन रिसर्च सेंटरने केलेल्या संशोधनानुसार, ऑलिव्ह ऑईलचा गंध घेतल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. दह्यामध्ये ऑलिव्ह ऑइल एकत्र करून त्याचा आहारात समावेश केल्यास शरीराला कमी कॅलरीज मिळतात. तसेच शरीरातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहण्यास मदत होते.

बडीशेप -

वेस्ट कोस्ट इंस्टिट्यूटने केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, कुरकुरीत आणि ताज्या रोपांचा गंध भूक भागविण्याचे काम करतो.

Intro:Body:

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प संसदेत मांडला. यामध्ये शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय जनतेला दिलासा देण्याचा पूर्ण प्रयत्न त्यांनी केला आहे. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे हा अर्थसंकल्प मतदारांसाठी आकर्षक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.