ETV Bharat / international

अमेरिकेच्या अध्यक्षांच्या वैद्यकीय सल्लागारालाच झाला कोरोना

author img

By

Published : Jun 16, 2022, 5:15 PM IST

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसारच्या रिपोर्टनुसार अँथनी फौसी यांना कोविड-19 ची लागण झाली आहे. तरीही फौकी यांनी घरून काम करणे सुरू ठेवले आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीत त्यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले.

अमेरिकेच्या अध्यक्षांच्या वैद्यकीय सल्लागारालाच झाला कोरोना
अमेरिकेच्या अध्यक्षांच्या वैद्यकीय सल्लागारालाच झाला कोरोना

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार अँथनी फौसी यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने जारी केलेल्या निवेदनानुसार, ८१ वर्षीय फौसी यांनी कोरोना लसीचे दोन बूस्टर डोसही घेतले होते. तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोविडची सौम्य लक्षणे आहेत. त्यातही दिलासादायक बाब म्हणजे अलीकडच्या काळात फौसी हे, अध्यक्ष जो बिडेन किंवा इतर कोणत्याही वरिष्ठ सरकारी अधिका-यांच्या संपर्कात आलेले नाहीत.

  • Anthony S Fauci, MD of the National Institute of Allergy and Infectious Diseases (NIAID) tests positive for COVID-19.

    (File Pic) pic.twitter.com/zTJolQaa9c

    — ANI (@ANI) June 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रॅपिड अँटीजेन चाचणीमध्ये कोरोना लागण झाल्याची माहिती: रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारे फौकी यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. ते सध्या कोरोना आरोग्य मार्गदर्शक तत्त्वे आणि त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करत आहेत. कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर ते कामावर परतणार आहेत. मात्र लक्षणे सौम्य असल्याने ते घरुनही काम करत आहेत.


फौकी हे राष्ट्राध्यक्ष बिडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍलर्जी आणि संसर्गजन्य रोगांचे संचालक आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या काळात ते व्हाईट हाऊसच्या कोरोना व्हायरस टास्क फोर्सचे प्रमुख सदस्य होते. या आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिकेचे आरोग्य सचिव झेवियर बेसेरा यांना कोरोनाची लागण झाली होती. बेसेरा यांना कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.