ETV Bharat / international

Pm Modi Conferred Frances Highest Award : पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान; इमॅन्युएल मॅक्रॉनने नरेंद्र मोदींना ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनरने केले सन्मानित

author img

By

Published : Jul 14, 2023, 8:31 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सने ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनरने सन्मानित केले आहे. हा पुरस्कार आतापर्यंत काही मोजक्या जागतिक नेत्यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे फ्रान्सने केलेला हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.

Pm Modi Conferred Frances Highest Award
पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान

पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले असून त्यांनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली आहे. यावेळी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनरने सन्मानित केले आहे. पंतप्रधान नरेंद्रम मोदी हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. भारतातील नागरिकांच्या वतीने या सन्मानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांचे आभार मानले. हा पुरस्कार सोहळा एलिसी पॅलेसमध्ये झाला.

जागतिक पातळीवरील मोजक्या नेत्यांचा सन्मान : फ्रान्सच्या भेटीवर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनरने सन्मान केला आहे. त्यामुळे भारतीयांची मान ताठ झाली आहे. याबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एका ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हस्ते फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला. यापूर्वी जागतिक पातळीवरील काही मोजक्या नेत्यांना फ्रान्सच्या ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आल्याची माहिती दिली आहे. भारत फ्रान्स मैत्रीचे प्रतीक असलेला एक भावनिक क्षण आहे, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.

कोणत्या नेत्यांना मिळाला फ्रान्सचा हा पुरस्कार : फ्रान्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेला हा पुरस्कार मोठा मानाचा समजला जातो. यापूर्वी हा पुरस्कार दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला, प्रिन्स ऑफ वेल्स किंग चार्ल्स, माजी जर्मन चांसलर अँजेला मर्केल आणि संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस बुट्रोस घाली यांचा समावेश आहे. फ्रान्सने दिलेला हा सन्मान विविध देशांनी पंतप्रधान मोदींना दिलेल्या सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि सन्मानांच्या मालिकेतील आणखी एक मानाचा तुरा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना या पुरस्काराने करण्यात आले सन्मानित : फ्रान्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित केले आहे. मात्र त्या अगोदरही अनेक देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक महत्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यात जून 2023 मध्ये इजिप्तचा ऑर्डर ऑफ द नाईल, मे 2023 मध्ये पापुआ न्यू गिनीचा कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू, मे 2023 मध्ये कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी, मे 2023 मध्ये पलाऊ प्रजासत्ताकाचा अबकाल पुरस्कार, मे 2023 मध्ये ड्रुक ग्याल्पो 2021 मध्ये भूतान, 2020 मध्ये यूएस सरकारकडून लीजन ऑफ मेरिट, 2019 मध्ये बहरीनचे किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्स, 2019 मध्ये मालदीवद्वारे निशान इज्जुद्दीनचा विशिष्ट पुरस्कार, रशियाचा ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू पुरस्कार, ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कार 2019 मध्ये UAE कडून, 2018 मध्ये ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन अवॉर्ड, 2016 मध्ये अफगाणिस्तानचा स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान आणि 2016 मध्ये सौदी अरेबियाचा ऑर्डर ऑफ अब्दुलाझीझ अल सौद पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा -

  1. PM Narendra Modi France Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये दाखल; गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागत
  2. Narendra Modi France Visit : काळ्या वादळात राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे डगमगले नाहीत, ही मैत्री निर्णायक वळणावर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.