ETV Bharat / international

Israel Hamas War Update : इंधनाचा तुटवडा, इस्रायली बॉम्बफेकीमुळं गाझामध्ये आरोग्य यंत्रणा कोलमडली; इस्रायल हमास युद्धाचे अपडेट वाचा एका क्लिकवर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 12:07 PM IST

Updated : Oct 26, 2023, 12:14 PM IST

Israel Hamas War Update : इंधनाचा तुटवडा आणि इस्रायली बॉम्बफेकीमुळे आरोग्य यंत्रणा कोसळल्याची घोषणा गाझामधील आरोग्य मंत्रालयानं केलीय. तसंच संयुक्त राष्ट्रातील इस्रायलचे राजदूत गिलाड एर्डन यांनी रशिया आणि चीनवर टीका केलीय.

Israel Hamas War Update
Israel Hamas War Update

गाझा Israel Hamas War Update : हमासच्या नियंत्रणाखाली असलेल्या गाझामधील आरोग्य मंत्रालयानं इंधनाचा तुटवडा आणि इस्रायली बॉम्बफेकीमुळे आरोग्य यंत्रणा "संपूर्ण कोसळल्याची" घोषणा केलीय. मंत्रालयानं म्हटलंय की, आरोग्य संस्थांनी काम करणं थांबवलंय तसंच जी रुग्णालयं उघडी आहेत ती यापुढे सेवा देऊ शकत नाहीत. इस्रायलवर हमासच्या हल्ल्यात 7 ऑक्टोबरला 1400 हून अधिक लोक मारले गेले. तर हमासनं गाझामध्ये 220 हून अधिक लोकांना ओलीस ठेवलंय. गाझामधील अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल हल्ल्यांमध्ये सुमारे 6,500 लोक मारले गेले आहेत.

इस्रायलच्या राजदूतांची रशिया आणि चीनवर टीका : संयुक्त राष्ट्रातील इस्रायलचे राजदूत गिलाड एर्डन यांनी रशिया आणि चीनवर टीका केलीय. रशिया आणि चीननं बुधवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या नेतृत्वाखालील मध्यपूर्वेवरील मसुदा ठरावावर व्हेटो केला होता. इस्रायलचे राजदूत गिलाड एर्डन म्हणाले की, इस्रायलमध्ये आपण आपल्या अस्तित्वासाठी लढत आहोत. तुमच्यापैकी कोणत्याही देशानं असाच नरसंहार सहन केला, तर मला खात्री आहे की तुम्ही इस्रायलपेक्षा जास्त ताकदीनं निषेध कराल.

सामूहिक शिक्षेसाठी पॅलेस्टीनी योग्य नाही : सुरक्षा परिषदेत दिलेल्या निवेदनात 7 ऑक्टोबरच्या हमास हल्ल्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला होता. इस्रायली मुत्सद्दींचा हा आरोप यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी फेटाळून लावलाय. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील बिघडत चाललेल्या संकटावर मंगळवारच्या सुरक्षा परिषदेच्या चर्चेला संबोधित करताना संयुक्त राष्ट्र प्रमुख म्हणाले की, 7 ऑक्टोबर रोजी हमासनं केलेल्या हल्ल्यांचं समर्थन कोणीही करू शकत नाही. परंतु, हे महत्त्वाचं आहे की हा हल्ला अचानक झाला नाही आणि सामूहिक शिक्षेसाठी पॅलेस्टिनी योग्य नाहीत.

अल जझीराच्या प्रतिनिधीचा मृत्यू : इस्रायली हवाई हल्ल्यात गाझा पट्टीतील अल जझीराचे मुख्य वार्ताहर वेल दहदौह त्याची पत्नी, मुलगा आणि मुलगी हे सर्व ठार झाले आहेत. अल जझीराच्या म्हणण्यानुसार, इस्रायली हवाई हल्ल्यात दहदौहच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला. तसंच इतर अनेक नातेवाईक अद्याप बेपत्ता आहेत आणि इतर किती जण मारले गेले हे अस्पष्ट आहे.

हेही वाचा :

  1. Israel Hamas War : भारताकडून पॅलेस्टाईनला मदतीचा हात, हवाई दलाचं विमान मदत साहित्य घेऊन रवाना
  2. Hamas Israel war : इस्रायल हमास युद्धाचा 16 दिवस; गाझावर पुन्हा हल्ला करण्याची इस्रायलनं आखली योजना
  3. Gaza West Bank Relation : युद्धात वारंवार उल्लेख होणाऱ्या गाझा, वेस्ट बँक आणि पॅलेस्टाईन यांच्यात संबंध काय, जाणून घ्या
Last Updated : Oct 26, 2023, 12:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.