ETV Bharat / international

Israel Hamas Conflict : हमासला काय हवंय? अनेक वर्षांपासून इस्त्रायलबरोबर आहे संघर्ष

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2023, 11:06 AM IST

Israel Hamas Conflict इस्रायल आणि हमासच्या दहशतवाद्यांमधील युद्धाचा आज चौथा दिवस आहे. हमास या संघटनेला विरोध करत अनेक देशांनी इस्रायलला या संघर्षात साथ देण्याचे आश्वासन दिले आहे. जाणून घेऊ, हमास या संघटनेबाबत अधिक माहिती.

Israel Hamas Conflict
Israel Hamas Conflict

बैरुत- Israel Hamas Conflict - हमास ही २००७ पासून गाझापट्टीत वर्चस्व गाजवणारी संघटना आहे. आठवडाखेर हमासनं इस्रायलवर हल्ला करत शेकडो नागरिकांना ठार केले तर अनेकांना ओलिस ठेवले आहे. हमासनं सीमेलगत असलेल्या इस्रायलच्या नागरिकांसह सैन्यदलाच्या संस्थावर हल्ला केला. त्यामुळे इस्त्रायलसह त्याच्या मित्रदेशांनाही धक्का बसलाय. हमासच्या आक्रमणामुळे इस्त्रायनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. मात्र, हमास ही संघटना काय करते, याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.

काय आहे हमास? हमास ही संघटना शेख अहमद यासीन यांनी १९८७ मध्ये स्थापना केली. शेख अहमद यासीन हे पॅलेस्टाईन निर्वासित असल्यानं गाझा येथ राहत होते. हमास हे नाव अरबी भाषेतील असून त्याचा अर्थ इस्लामिक संघर्ष चळवळ आहे. या संघटनेची मुळं ही इजिप्तमध्ये १९२० मध्ये स्थापन झालेल्या मुस्लिम ब्रदरहुड संघटनेशी आहेत. मुस्लिम ब्रदरहुड ही जगातील आघाडीची सुन्नी समाजबांधवांची संघटना आहे. इस्त्रायलमध्ये आत्मघातकी बॉम्बहल्ले आणि इस्राइलच्या नागरिकांसह सैनिकांवर प्राणघातकी हल्ला करणारी संघटना म्हणून हमासची ओळख आहे. त्यामुळे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानं हमास संघटनेला १९९७ मध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं. त्यापाठोपाठ युरोपियन युनियन आणि इतर पाश्चिमात्य देशांनीदेखील हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं.

  • Even artificial intelligence is more humane than Hamas terrorists.

    Hamas terrorists are not human beings.

    They are evil, barbaric, murderers.

    Share. pic.twitter.com/1oMEuD4gb8

    — Israel ישראל 🇮🇱 (@Israel) October 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इस्त्रायलच्या नाकाबंदीनं वाढला ताण- हमास संघटनेनं २००६ मध्ये संसदीय निवडणुकीत विजय मिळविला. त्यानंतर मोठे राजकीय बदल झाले. हमासनं हिंसाचार घडवून आणत २००७ मध्ये गाझापट्टीत बेकायदेशीररित्या ताबा मिळविला. हमासनं गाझावर ताबा मिळविल्यानंतर इस्त्रायलनं या परिसरात नाकाबंदी करत लोकांची आणि मालाची वाहतूक थांबविली. त्यामागे हमासला मिळणारी शस्त्रास्त्रे रोखण्याचा हेतू होता. मात्र, त्याचा गाझाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाल्यानं पॅलेस्टाईन नागरिकांच्या असंतोषात भर पडली. अनेक वर्षांपासून हमासला कतार, तुर्की अशा अरबी देशांकडून पाठिंबा मिळत आहे

कोण आहेत हमासचे नेते? अध्यात्मिक गुरू अशी ओळख असलेले यास्सीन हे हमासचे संस्थापक आहे. दिव्यांग असलेले यास्सीन यांनी व्हीलचेअरवर बसून इस्त्रायच्या तुरुंगात काही वर्षे घालविली आहेत. हमासची स्थापना केल्यानंतर त्यांनी १९९३ मध्ये पहिला आत्मघातकी हल्ला घडवून आणला. २००४ मध्ये यास्सीन यांच्या मृत्यूनंतर इस्त्रायलच्या सैन्यदलाला हमासकडून नेहमची लक्ष्य केलं जात आहे. इस्राइलच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले खलीद माशाल हे पुन्हा हमासचे नेते बनले. येहिया सिन्वर, इस्माईल हनियेह हे हमासचे सध्याचे नेते आहेत. हमासचे अनेक नेते बैरुत येते स्थलांतरित झाले आहेत.

हमास आणि इस्त्रायलमध्ये संघर्ष सुरू- गेल्या काही वर्षात पॅलेस्टाईनबरोबरील वादात कोणतीही तडजोड न करता इस्त्रायलनं अरब देशांशी शांतता करार केले आहेत. हमासला इराणकडून पाठिंबा असताना अमेरिकनं इस्त्रायल आणि सौदी अरेबियामधील करारात मध्यस्थाची भूमिका पार पाडली. त्यामुळे हमास आणि इस्त्रायलच्या तणावात आणखीनंच भर पडली आहे. बेकायदेशीरपणे हजारो कैदी इस्त्रायलच्या तुरुंगात असल्याचा आरोप हमासकडून करण्यात येतो. इस्त्रायलच्या दाव्यानुसार हमासकडं ३० हजार फायटर, रॉकेटच्या मोठ्या साठ्यासह मानवरहित ड्रोन आहेत. हमास आणि इस्त्रायलमधील वाद हा अचानक पुन्हा उफाळून आला. त्याची परिणीती युद्धात झालीय.

हमासला काय हव आहे?हमासनं आजवर गाझामधून इस्त्रायलवर अनेक आत्मघातकी हल्ले आणि रॉकेट हल्ले केले आहेत. इजिप्तमधून शस्त्रांची तस्करी करण्यासाठी हमासनं बोगदे खोदले आहेत. तसंच या बोगद्यांमधून इस्त्रायलवर हल्ले करण्यात येतात. गेल्या काही वर्षांत हमासनं इस्त्रायलवर हल्ला करण्यापेक्षा गाझाचे काम चालविण्याकडे अधिक लक्ष केंद्रित केल्याचं दिसून आलं. असं असले तरी हमासला पॅलेस्टाईन हा स्वतंत्र हवा आहे. त्यासाठी इस्त्रायलचा नाश करण्याची हमासची भूमिका आहे.

हेही वाचा-

  1. Israel Hamas War : हमासच्या रॉकेट हल्ल्यात एक भारतीय महिला जखमी, दूतावासानं दिली प्रकृतीची अपडेट
  2. USA in Support of Israel : हमास इस्रायल युद्ध आणखी भडकणार! अमेरिकेची इस्रायलला 'ही' मोठी मदत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.