ETV Bharat / international

अफगाणिस्तान सरकार ४०० तालिबान्यांना करणार मुक्त

author img

By

Published : Aug 11, 2020, 6:27 PM IST

तालिबानने दिलेल्या ५००० कैद्यांच्या यादीमधील ४०० कैद्यांची शिक्षा माफ करुन त्यांना मुक्त करण्यात येत आहे, अशा आशयाचे ट्विट अध्यक्षांच्या कार्यालयाने केले. रविवारी ३,४०० सदस्य असणाऱ्या ग्रँड असेंब्लीमध्ये (लोया जिर्गा) या कैद्यांना सोडावे की नाही याबाबत मतदान घेण्यात आले. त्यानंतर, सोमवारी सायंकाळी उशीरा याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली.

Afghan President signs decree to free 400 Taliban inmates
अफगाणिस्तान सरकार ४०० तालिबान्यांना करणार मुक्त

काबुल : अफगाणिस्तानचे अध्यक्ष मोहम्मद अशरफ घनी यांनी ४०० तालिबानी कैद्यांना मुक्त करण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आहे. अध्यक्षांच्या कार्यालयाने याबाबत माहिती दिली.

तालिबानने दिलेल्या ५००० कैद्यांच्या यादीमधील ४०० कैद्यांची शिक्षा माफ करुन त्यांना मुक्त करण्यात येत आहे, अशा आशयाचे ट्विट अध्यक्षांच्या कार्यालयाने केले. रविवारी ३,४०० सदस्य असणाऱ्या ग्रँड असेंब्लीमध्ये (लोया जिर्गा) या कैद्यांना सोडावे की नाही याबाबत मतदान घेण्यात आले. त्यानंतर, सोमवारी सायंकाळी उशीरा याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली.

फेब्रुवारीमध्ये अमेरिका आणि तालिबानमध्ये झालेल्या शांतता करारानुसार, अफगाण सरकार हे ५ हजार तालिबानी कैद्यांना मुक्त करणार आहे. ज्या बदल्यात तालिबान अफगाणिस्तानच्या १ हजार सैनिकांना मुक्त करेल. यासोबतच, या करारानुसार पुढील वर्षीच्या जुलैमध्ये तेव्हाची परिस्थिती पाहून अमेरिकेचे सैन्यही अफगाणिस्तानमधून हटवण्यात येणार आहे.

दरम्यान, हे कैदी मुक्त करण्याबाबत आदेश देण्यात आला असला तरी, या कैद्यांना कधी मुक्त करण्यात येणार आहे. याबाबत सरकारने कोणतीही माहिती दिली नाही. अफगाण आणि तालिबानमधील शांतता चर्चेच्या फेऱ्या या कैद्यांना सोडल्यानंतर पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.