ETV Bharat / international

Leave from Kharkiv : नागरिकांनी लवकर खार्कीव्ह सोडावे; भारतीय दूतावासाचा सल्ला

author img

By

Published : Mar 2, 2022, 8:06 PM IST

नागरिकांनी खार्कीव्हला (Leave from Kharkiv ) सुरक्षित झोनमध्ये किंवा पिसोचिन, बेझल्युडोव्हका आणि बाबेकडे जावे. सद्यपरिस्थिती लक्षात घेता, नागरिकांनी तात्काळ जाण्याचा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाने ट्विटद्वारे दिला आहे.

Leave from Kharkov
Leave from Kharkov

नवी दिल्ली - रशिया युक्रेन (Russia Ukraine conflict) मध्ये चाललेल्या युध्दाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने लोकांना खार्कीव्ह सोडण्याचे तसेच तेथून सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. नुकतेच भारताचे परराष्ट्र मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. रशियन सैन्याने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

  • The advisory that has just been issued by our Embassy is on the basis of information received from Russia. We would urge all our nationals to leave Kharkiv immediately to safe zones or further westwards using any means available, including on foot, & keeping safety in mind: MEA pic.twitter.com/3CuDIf1o5A

    — ANI (@ANI) March 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारतीय दूतावासाने नुकताच जारी केलेला सल्ला रशियाकडून हाती आलेल्या माहितीवर आहे. नागरिकांनी खार्कीव्हला सुरक्षित झोनमध्ये किंवा पिसोचिन, बेझल्युडोव्हका आणि बाबेकडे जावे. सद्यपरिस्थिती लक्षात घेता, नागरिकांनी तात्काळ जाण्याचा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाने ट्विटद्वारे दिला आहे.

काल कीव सोडण्याचा दिलेला सल्ला

रशिया-युक्रेन संघर्षामुळे ( Russia Ukraine conflict ) बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना मंगळवारी राजधानी कीव सोडण्याचा ( Leave Kyiv Urgently ) सल्ला दिला आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने (Indian Embassy in Ukraine Tweet) ट्विट केले की, 'कीवमधील विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांनी तात्काळ कीव सोडावे. ट्रेनसह उपलब्ध कोणत्याही मार्गाने कीव सोडा.

युक्रेनमध्ये दोन भारतीयांचा मृत्यू

युक्रेनमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू ( Indian Student Killed in Ukraine ) झाला आहे. त्याचबरोबर एका विद्यार्थांचा आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. युक्रेनमधील खार्किव येथे मंगळवारी सकाळी झालेल्या मिसाईल हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्वीटकरुन माहिती दिली.

हेही वाचा - Indian Tricolor came to rescue : तिरंगा आला मदतीला; पाकिस्तानी आणि तुर्किश नागरिकांनी पार केल्या लष्करी चौक्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.