ETV Bharat / international

Russia-Ukraine Conflict : कीवमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर झाडली गोळी, रुग्णालयात दाखल

author img

By

Published : Mar 4, 2022, 9:54 AM IST

रशिया-युक्रेन युद्धाचे ( Russia Ukraine War ) परिणाम संपूर्ण जगावर होत आहेत. यात युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले भारतीय विद्यार्थीही भरडले जात आहेत. रशिया-युक्रेन युद्धात आतापर्यंत दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर आता आणखी एक वाईट बातमी आली आहे. आज पुन्हा एका विद्यार्थ्याला गोळी ( Student shot in Ukraine ) लागल्याची घटना घडली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ेिे
रशिया-युक्रेन युद्ध

कीव - रशियाने युक्रेनविरोधात युद्ध ( Russia Ukraine War ) पुकारलं आहे. याचे पडसाद संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे. शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले भारतीय विद्यार्थी तिथे अडकले आहेत. त्यांना सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. मिळेल्या त्या मार्गाने युक्रेनमधील शहरे सोडून युक्रेनच्या शेजारील देशांच्या सीमेवर पोहचण्याचे भारत सरकारकडून विद्यार्थ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. रशिया-युक्रेन युद्धात आतापर्यंत दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर आता आणखी एक वाईट बातमी आली आहे. आज पुन्हा एका विद्यार्थ्याला गोळी ( Student shot in Ukraine ) लागल्याची घटना घडली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री (एमओएस) जनरल व्हीके सिंग यांनी गुरुवारी पोलंडच्या रझेझो विमानतळावर ही माहिती दिली. जनरल (निवृत्त) सिंग यांनी एएनआयला सांगितले की, 'कीवमधील एका विद्यार्थ्याला गोळी लागल्याची माहिती मिळाली आणि त्याला तात्काळ कीव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. भारतीय दूतावासाने याआधी सर्वांनी कीव सोडले पाहिजे, असे प्राधान्याने स्पष्ट केले होते. युद्धाच्या प्रसंगी बंदुकीची गोळी कोणाचा धर्म आणि राष्ट्रीयत्व पाहत नाही, असेही ते पुढे म्हणाले.

युक्रेनमधून (Ukraine) भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकार 'ऑपरेशन गंगा' (Operation Ganga) राबवत आहे. याअंतर्गत आतापर्यंत विशेष विमानांद्वारे भारतीयांना तेथून परत आणण्यात येत आहे. सोमवारी 28 फेब्रुवारी रोजी 249 भारतीय नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे एक विशेष विमान दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. रोमानियामार्गे युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरीही 18,000 हून अधिक भारतीय तेथे अडकले आहेत. भारतीय विद्यार्थी सध्या युद्धग्रस्त देश सोडून भारतात सुरक्षित परतण्यासाठी पोलंडच्या सीमेवर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. चार केंद्रीय मंत्री, हरदीपसिंग पुरी, ज्योतिरादित्य एम सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्हीके सिंग -- युक्रेनला लागून असलेल्या देशांमधील स्थलांतराच्या प्रयत्नांची पाहणी करत आहेत.

दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू -

यापूर्वी युक्रेनमध्ये दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले भारतीय विद्यार्थीही भरडले जात आहेत. त्यातच खारकिव्हमध्ये भीषण गोळीबारामुळे एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. परराष्ट्र मंत्रालयाने त्याच्या मृत्यूची माहिती दिली होती. हा विद्यार्थी कर्नाटकमधील रहिवासी होता. त्याचं नाव नवीन शेखरप्पा असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुन्हा एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. हा विद्यार्थी पंजाबमधील रहिवासी होता. या विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण स्टोक असून, तो बऱ्याच काळापासून रुग्णालयात दाखल होता.

हेही वाचा - HSC Exam : आजपासून बारावीची परीक्षा सुरू; १४ लाख ८५ हजार विद्यार्थी देणार परीक्षा!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.