ETV Bharat / international

फ्रान्समध्ये कोरोनामुळे 24 तासांत आणखी 957 मृत्यू, आकडा 52 हजारांजवळ

author img

By

Published : Nov 28, 2020, 7:10 PM IST

फ्रान्समध्ये शुक्रवारी 24 तासांत 957 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. यासह मृतांच्या एकूण आकडा 51 हजार 914 वर पोहोचला आहे. एकूण कोविड -19 रुग्णांची आतापर्यंतची संख्या 21 लाख 96 हजार 119 वर पोहोचली आहे.

फ्रान्स कोविड-19 अपडेट
फ्रान्स कोविड-19 अपडेट

पॅरिस - फ्रान्समध्ये शुक्रवारी 24 तासांत 957 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. यासह मृतांच्या एकूण आकडा 51 हजार 914 वर पोहोचला आहे.

देशाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, या आठवड्यात रुग्णालयांमध्ये नवीन कोविड - 19 रुग्णांची संख्या घटली आहे.

वृत्तसंस्था सिन्हुआच्या माहितीनुसार, मागील 24 तासांत फ्रान्समधील रुग्णालयांत 393 मृत्यूंची नोंद झाली आहे. उर्वरित 564 मृत्यू नर्सिंग होममध्ये झाले आहेत.

एकूण कोविड -19 रुग्णांची आतापर्यंतची संख्या 21 लाख 96 हजार 119 वर पोहोचली आहे.

हेही वाचा - अमेरिकेत कोरोनाचे बळी 2.6 लाखांवर, मार्च 2021 पर्यंत 4.7 लाखांच्या पुढे जाण्याचा अंदाज

संसर्ग झालेल्यांपैकी लक्षणे असलेल्या 28 हजार 648 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अतिदक्षता विभागातील रुग्णांची संख्या 135 ने घटून ती 3 हजार 883 पर्यंत कमी झाली आहे. मागील दोन आठवड्यांतील ही सर्वांत कमी संख्या आहे.

जगातील बहुतेक देश कोविड-19 साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी संघर्ष करत आहेत. यावरती लस शोधण्याच्या शर्यतीत फ्रान्स, चीन, रशिया, ब्रिटन आणि अमेरिकेसह अनेक देश सहभागी आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाइटनुसार, 12 नोव्हेंबरपर्यंत जगभरात 212 कोविड - 19 (candidate - उमेदवार) लसी विकसित करण्यात आल्या असून त्यापैकी 48 क्लिनिकल ट्रायल्समध्ये आहेत.

हेही वाचा - ब्रिटनमध्ये 24 तासांत 696 मृत्यू, 5 मेपासूनची कोरोनाच्या बळींची सर्वाधिक आकडेवारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.