ETV Bharat / international

अफगाणिस्तानची वाघिण सलीमा मजारी तालिबान्यांच्या ताब्यात, जाणून घ्या कोण आहे ती...

author img

By

Published : Aug 18, 2021, 3:47 PM IST

Updated : Aug 18, 2021, 5:29 PM IST

तालिबान अफगाणिस्तानमधील महिलांना पूर्वीच्या राजवटीपेक्षा वेगळ्या दृष्टीने वागवतील का याबद्दल बरीच चर्चा चालू आहे. मात्र, अफगाणिस्तानातील महिलांना तालिबानी राजवटीत सुरक्षित वाटत नाही. या दरम्यान सलीमा यांना तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

सलीमा मजारी
सलीमा मजारी

काबुल- अफगाणिस्तानातील पहिल्या महिला राज्यपालांपैकी एक, मझारी इतर अनेक राजकीय नेत्यांप्रमाणे देश सोडून पळून गेली नाही. चाहर किंट जिल्ह्यातील बाल्ख प्रांताच्या शरणागतीपर्यंत ती लढत राहिली. तिने तालिबानशी लढण्यासाठी शस्त्र घेण्याचा निर्णय घेतला. तिला आता तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तिच्या सद्यस्थितीबद्दल कोणतीही माहिती नाही.

सलीमा मजारी या अफगाणिस्तानच्या तीन महिला राज्यपालांपैकी एक आहेत. मजारीने शेवटपर्यंत तिच्या प्रांतासाठी लढा दिला. चहर हा एकमेव जिल्हा आहे जो कोणत्याही दहशतवादी गटांच्या अंतर्गत येत नाही. मजारी यांनी गेल्या वर्षी 100 तालिबानी लोकांना तिने ठार मारले होते.

सलीमा मजारी
सलीमा मजारी

हेही वाचा-अफगाणिस्तानातील परिस्थितीला स्थानिक नेतेच जबाबदार - अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन

तालिबान अफगाणिस्तानमधील महिलांना पूर्वीच्या राजवटीपेक्षा वेगळ्या दृष्टीने वागवतील का याबद्दल बरीच चर्चा चालू आहे. मात्र, अफगाणिस्तानातील महिलांना तालिबानी राजवटीत सुरक्षित वाटत नाही. या दरम्यान सलीमा यांना तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा-डिप्लोमॅट्स, दूतावासातील अधिकाऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही; तालिबानचे आश्वासन

कोण आहे मजारी

  1. मजारीचा जन्म इराणमध्ये झाला. तिचे कुटुंब अफगाणिस्तानातील सोव्हिएत युद्धातून पळून गेले होते.
  2. तिने तेहरानमधील विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. अफगाणिस्तानात परतण्यापूर्वी तिने आंतरराष्ट्रीय स्थलांतर संस्थेमध्ये काम केले.
  3. चारकिंट ही तिची वडिलोपार्जित जन्मभूमी आहे. तिने 2018 मध्ये जिल्ह्यातून जिल्हा गव्हर्नर पदासाठी अर्ज केला आणि तिला यश मिळाले.
  4. तिने द गार्डियनला सांगितले, "ज्या दिवशी मला जिल्हाधिकारी म्हणून चारकिंटमध्ये अधिकृतपणे स्वागत झाले, त्या दिवशी मी पाठिंब्याने भारावून गेली.
  5. मझारी यांना वाटते की, राजकीय गोंधळामुळे प्रांतासाठी काम करणे आणि व्यवस्थेतील भ्रष्टाचारामुळे युद्ध आणखी कठीण झाले आहे.
  6. मझारी यांनी तालिबानशी लढण्यासाठी एक लष्करी टीम तयार केली होती, कारण तालिबान्यांनी एका नंतर एक जिल्हा ताब्यात घेण्यास सुरवात केली होती.
  7. यापूर्वी, ती अनेक जीवघेण्या घातपाती हल्ल्यांपासून तसेच तालिबान आणि इतर लष्करी गटांनी रचलेल्या कटांमधून वाचली आहे.

हेही वाचा-अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर जो बायडेन आणि बोरिस जॉन्सन यांच्यात चर्चा

दरम्यान, संकटकाळात अफगाणिस्तान नागरिकांना भारताने मदतीचा हात देऊ केला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट सत्तेत येत असताना अनेक अफगाणिस्तानमधील नागरिकांना भारतात येण्याची इच्छा आहे. ही स्थिती लक्षात घेता भारताने अफगाणिस्तानमधील नागरिकांकरिता आपत्कालीन ई-व्हिसा जाहीर केला आहे.

काबुलमधील विमानतळावर सात जणांचा मृत्यू

दरम्यान, काबुलमधील मुख्य विमानतळावर हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. तालिबानींच्या भीतीने नागरिक हे विमानावर चढले होते. विमान उड्डाण करत असताना विमानावरून खाली पडल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाला. काबुलमधील विमानतळावर गोंधळ सुरू असताना किमान सात जणांचा मृत्यू झाल्याचे अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले. 20 वर्षानंतर अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सैनिक हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणवर ताबा मिळविला आहे.

Last Updated : Aug 18, 2021, 5:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.