ETV Bharat / international

पुलवामा हल्ल्यातील दोषींवर कारवाई करण्याची जबाबदारी पाकिस्तान अद्याप टाळतंय

author img

By

Published : Aug 28, 2020, 9:13 AM IST

जैश-ए-मोहम्मद या संघटनेने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. संघटना आणि त्याचे नेतृत्व पाकिस्तानमध्येच आहे. दोषारोपपत्रातील पहिला आरोपी मसूद अझरला अजूनही पाकिस्तानमध्ये आश्रय मिळत आहे, हे खेदजनक आहे.

प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव
प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करण्याची जबाबदारी पाकिस्तान नेहमीप्रमाणे टाळत आहे. कुख्यात दहशतवादी मसूद अझहरला ते अजूनही संरक्षण देत आहेत. यावरून भारताकडून पाकिस्तानवर टीका करण्यात आली आहे.

14 फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या हल्ल्यानंतर दीड वर्षे तपास करून आरोपपत्र दाखल केले आहे. दहशतवादाच्या कृत्याची दखल घेण्यासाठी आणि अशा भयंकर गुन्हेगाराच्या दोषींना न्यायासमोर आणण्यासाठी हा खटला दाखल करण्यात आला आहे. आमचे उद्दिष्ट फक्त निवेदने किंवा अधिसूचना जारी करणे नव्हे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे नेतृत्व पाकिस्तानमध्ये होते आणि त्याचे पुरेसे पुरावे त्यांना दिले असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.

हेही वाचा - कुलभूषण जाधव : कायदेशीरदृष्ट्या भारतीय वकील नियुक्त करणे शक्य नाही - पाक

जैश-ए-मोहम्मद या संघटनेने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. संघटना आणि त्याचे नेतृत्व पाकिस्तानमध्येच आहे. दोषारोपपत्रातील पहिला आरोपी मसूद अझरला अजूनही पाकिस्तानमध्ये आश्रय मिळत आहे, हे खेदजनक आहे. आम्ही त्यांना भरपूर पुरावे दिले आहेत. परंतु, पाकिस्तान अजूनही जबाबदारीपासून दूर पळत आहे. २००८ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषींवरही पाकिस्तानने कोणतीही विश्वासार्ह कारवाई अद्याप केलेली नाही. २५ परदेशी व्यक्तींसह एकूण १६५ निरपराध लोकांचा या हल्ल्यात जीव गेला होता, असे श्रीवास्तव म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.