ETV Bharat / international

सुरक्षा परिषदेत मसूदचा निर्णय आज, आक्षेपाची मुदत दुपारी ३ वाजता संपणार

author img

By

Published : Mar 13, 2019, 12:46 PM IST

हा प्रस्ताव २७ फेब्रुवारीला चौथ्यांदा दाखल करण्यात आला. त्यानंतर तो 'नो-ऑब्जेक्शन'साठी १० कार्यालयीन दिवसांच्या कालावधीसाठी ठेवण्यात आला होता. ही मुदत आज (बुधवार) दुपारी ३ वाजता संपत आहे.

मसूद अझहर

संयुक्त राष्ट्रे - जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तयारी केली आहे. २४ तासांमध्ये मसूदबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. 'मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे,' अशी मागणी भारताने सुरक्षा परिषदेकडे केली होती. फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेने पुढाकार घेत हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडला होता. आता तरी या प्रयत्नाला यश येईल का, याकडे संपूर्ण देशाचे आणि जगाचेही लक्ष लागले आहे.

हा प्रस्ताव २७ फेब्रुवारीला चौथ्यांदा दाखल करण्यात आला. यापूर्वी प्रत्येक वेळी चीनने व्हिटोचा अधिकार वापरून मसूद अझहर आणि पाकिस्तानला वाचवले होते. यामुळे चीनच्या भूमिकेवर जगभरातून टीका होत आहे. त्यानंतर तो 'नो-ऑब्जेक्शन'साठी १० कार्यालयीन दिवसांच्या कालावधीसाठी ठेवण्यात आला होता. ही मुदत आज (बुधवार) दुपारी ३ वाजता संपत आहे. आता चीन पुन्हा एकदा नकाराधिकाराचा वापर करणार काय, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

'मसूद अझहर आंतराराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या सर्व निकषांना पात्र आहे. मंजूरी समितीसह आम्ही दहशतावाद्यांची यादी अद्ययावत आणि अचूक करण्यासाठी प्रयत्नशील आहोत,' असे सूचक वक्तव्य अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटचे उपप्रवक्ते रॉबर्ट पॅलाडिनो यांनी केले होते. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यास हा भारताचा मोठा विजय ठरणार आहे. तसेच, दहशतवादा खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला दणका बसणार आहे.

पाकिस्तान सरकारच्या सूत्रांनी, मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याविरोधात घेतलेला पवित्रा पाक सरकार मागे घेण्याची शक्यता काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. मसूद हा पाकिस्तानचा नागरिक आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने जैश-ए-मोहम्मद आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानविरोधात कडक भूमिका घेतली होती. यामुळे पाकिस्तान सरकार नरमाईची भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मसूद सध्या मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी असून तो पाकिस्तानात उपचार घेत असल्याचे पाक परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितले होते. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यास त्याला घरीच नजरकैदेत ठेवण्यात येईल की, तुरुंगात रवानगी करण्यात येईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आता देशाचे हित लक्षात घ्यायचे की, मसूदसारख्या दहशतवाद्याला पाठिशी घालायचे, हा निर्णय पाकिस्तानला घ्यावा लागेल, असे संबंधित सुरक्षा अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी म्हटले होते.

मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यास त्याच्या जागतिक प्रवासाला बंदी घालावी, मालमत्ता जप्त करावी, हत्यारे बाळगण्यावर निर्बंध येतील. सुरक्षा परिषद मंजूरी समिती १५ सदस्य देशांपैकी व्हिटोचा अधिकार आणि कायमचे सदस्यत्व असलेल्या या ३ देशांच्या मागणीवर १० दिवसांत यावर विचार करत आहे. मागील १० वर्षांत अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याची मागणी करणारा प्रस्ताव चौथ्यांदा मांडण्यात आला आहे.

Intro:Body:

UNSC set to decide on designating JeM chief Masood Azhar as 'global terrorist' today

UNSC, JeM chief Masood Azhar, pakistan, jaish e mohammed, global terrorist, veto, china, france, britan, india, us, no objection

--------

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तयारी...

२४ तासांच्या आत येणार निर्णय...

आक्षेप घेण्याची मुदत आज दुपारी ३ वाजता संपणार...

--------------------

सुरक्षा परिषदेत मसूदचा निर्णय आज, आक्षेपाची मुदत दुपारी ३ वाजता संपणार

संयुक्त राष्ट्रे - जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तयारी केली आहे. २४ तासांमध्ये मसूदबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. 'मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे,' अशी मागणी भारताने सुरक्षा परिषदेकडे केली होती. फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेने पुढाकार घेत हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडला होता. आता तरी या प्रयत्नाला यश येईल का, याकडे संपूर्ण देशाचे आणि जगाचेही लक्ष लागले आहे.

हा प्रस्ताव २७ फेब्रुवारीला चौथ्यांदा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी प्रत्येक वेळी चीनने व्हिटोचा अधिकार वापरून मसूद अझहर आणि पाकिस्तानला वाचवले होते. यामुळे चीनच्या भूमिकेवर जगभरातून टीका होत आहे. त्यानंतर तो 'नो-ऑब्जेक्शन'साठी १० कार्यालयीन दिवसांच्या कालावधीसाठी ठेवण्यात आला होता. ही मुदत आज (बुधवार) दुपारी ३ वाजता संपत आहे. आता चीन पुन्हा एकदा नकाराधिकाराचा वापर करणार काय, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

'मसूद अझहर आंतराराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या सर्व निकषांना पात्र आहे. मंजूरी समितीसह आम्ही दहशतावाद्यांची यादी अद्ययावत आणि अचूक करण्यासाठी प्रयत्नशील आहोत,' असे सूचक वक्तव्य अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटचे उपप्रवक्ते रॉबर्ट पॅलाडिनो यांनी केले होते. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यास हा भारताचा मोठा विजय ठरणार आहे. तसेच, दहशतवादा खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला दणका बसणार आहे.

पाकिस्तान सरकारच्या सूत्रांनी, मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याविरोधात घेतलेला पवित्रा पाक सरकार मागे घेण्याची शक्यता काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. मसूद हा पाकिस्तानचा नागरिक आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने जैश-ए-मोहम्मद आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानविरोधात कडक भूमिका घेतली होती. यामुळे पाकिस्तान सरकार नरमाईची भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मसूद सध्या मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी असून तो पाकिस्तानात उपचार घेत असल्याचे पाक परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितले होते. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यास त्याला घरीच नजरकैदेत ठेवण्यात येईल की, तुरुंगात रवानगी करण्यात येईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आता देशाचे हित लक्षात घ्यायचे की, मसूदसारख्या दहशतवाद्याला पाठिशी घालायचे, हा निर्णय पाकिस्तानला घ्यावा लागेल, असे संबंधित सुरक्षा अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी म्हटले होते.

मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यास त्याच्या जागतिक प्रवासाला बंदी घालावी, मालमत्ता जप्त करावी, हत्यारे बाळगण्यावर निर्बंध येतील. सुरक्षा परिषद मंजूरी समिती १५ सदस्य देशांपैकी व्हिटोचा अधिकार आणि कायमचे सदस्यत्व असलेल्या या ३ देशांच्या मागणीवर १० दिवसांत यावर विचार करत आहे. मागील १० वर्षांत अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याची मागणी करणारा प्रस्ताव चौथ्यांदा मांडण्यात आला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.