ETV Bharat / international

दिलासादायक! भारतीय-अमेरिका नेतृत्वाखाली कोरोनावरील औषधाची क्लिनिकल चाचणी

author img

By

Published : Apr 30, 2020, 1:06 PM IST

प्राथमिक तपासणीमध्ये असे दिसून आले की, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्य ५० टक्के रुग्णांना ५ दिवस रेमडिसीव्हीरचा डोज दिल्यास रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तसेच अर्ध्याहून अधिक रुग्णांना गेल्या दोन दिवसांत घरी सोडण्यात आले आहे, असेही फार्मा कंपनीने सांगितले.

remdesivir  COVID-19  Corona drug  COVID-19 medicine  Gilead Sciences  Dr Anthony Fauci  Donald Trump
दिलासादायक!भारतीय-अमेरिका नेतृत्वाखाली कोरोनावरील औषधाची क्लिनिकल चाचणी

वॉशिंगटन - कोरोना विषाणूवरील औषध 'रेमडिसीव्हीर'ची तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी घेण्यात आली असून तिचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला आहे. भारतीय आणि अमेरिकन चिकित्सकांच्या नेतृत्वाखाली ही चाचणी घेण्यात आली, असे अमेरिकन फार्मा कंपनीने बुधवारी सांगितले.

प्राथमिक तपासणीमध्ये असे दिसून आले की, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्य ५० टक्के रुग्णांना ५ दिवस रेमडिसीव्हीरचा डोज दिल्यास रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तसेच अर्ध्याहून अधिक रुग्णांना गेल्या दोन दिवसांत घरी सोडण्यात आले आहे, असेही फार्मा कंपनीने सांगितले. तसेच ही तिसऱ्या टप्प्यातील चाचणी औषधांच्या परवानगीसाठीची शेवटची चाचणी असते, असेही त्यांनी सांगितले. मात्र, अद्याप रेमडिसीव्हीर या औषधाला जागतिक स्तरावर कुठेही परवाना मिळाला नाही. तसेच कोरोनाच्या उपचारासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले नाही.

कोरोना रुग्णावर 'रेमडिसीव्हीर'च्या १० दिवसांच्या उपचाराप्रमाणे ५ दिवसांचा उपचारामुळे रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकते का? याबाबत या चाचणीत अभ्यास केला असल्याचे कंपनीने सांगितले. याचे परिणाम सकारात्मक आले असून रुग्णांवर ५ दिवस उपचार केल्यास रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले, असे स्टॅनफोर्ड युनिर्व्हसिटी स्कूल ऑफ मेडीसीनमधील क्लिनिकल प्रोफेसरच्या एमडी अरुणा सुब्रम्हण्यम यांनी सांगितले. मात्र, अजूनही काही माहितीची गरज असून त्यानंतरच हे औषध सुरक्षित आहे की नाही, हे ठरवता येणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

कोरोनाच्या संकटकाळात नक्कीच ही अतिशय सकारात्मक बातमी आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांना सांंगितले. तसेच व्हाईट हाऊसने देखील ही अतिशय चांगली बातमी असल्याचे वर्णन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.