ETV Bharat / international

केनिया : बॉम्ब स्फोटात 11 पोलीस अधिकारी ठार

author img

By

Published : Oct 13, 2019, 11:39 PM IST

आतापर्यंत कोणीही या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, सोमालियातील अल-शबाब या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला आहे.

बॉम्ब स्फोट

नैरोबी - केनियाच्या सोमालियाशी लागून असलेल्या दक्षिण सीमेवर रस्त्याकडेला झालेल्या बॉम्ब स्फोटात 11 पोलीस अधिकारी मारले गेले. पोलीस प्रमुखांनी या घटनेची माहिती दिली.

पोलीस महानिरीक्षक हिलरी मुत्यमबई यांनी शनिवारी याविषयी माहिती दिली. लिबोई कस्ब्याजवळील दामाजले हारे हारे मार्गावर पोलिसांच्या गस्तीवरील कारला बॉम्बने उडवण्यात आले.

अल-कायदाशी संबंधित या दहशतवादी गटाने मागील काही वर्षांपासून केनियाच्या सुरक्षा दलांना लक्ष्य बनवण्यास सुरुवात केली आहे. या समूहाने सोमालियाच्या लष्कराला धडा शिकवण्यासाठी केनियातर्फे सैन्य पाठवले होते. 2011 मधील या घटनेनंतर त्याचा सूड उगवण्यासाठी हा गट हल्ले घडवून आणत आहे.

Intro:Body:

----------------

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.