ETV Bharat / entertainment

लोककारणी आनंद दिघे यांची भूमिका साकारणार प्रसाद ओक, ‘धर्मवीर मु.पो. ठाणे' चित्रपटात!

author img

By

Published : Apr 15, 2022, 10:48 AM IST

आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या आनंद दिघे या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघेंची भूमिका साकारत आहे.

dharmaveer anand dighe
dharmaveer anand dighe

मुंबई : लोकांना कोरोनाचा विसर पडत चाललाय आणि त्यामुळे चित्रपटगृहांत गर्दी दिसू लागली आहे. चित्रपटगृहे १००% क्षमतेने सुरु झाल्यापासून चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी रांगा लागलेल्या दिसताहेत. त्यातीलच एक म्हणजे धर्मवीर मु.पो. ठाणे'. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या आनंद दिघे या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

dharmaveer anand dighe movie
लोककारणी आनंद दिघे
अशा ‘लार्जर दॅन लाईफ' व्यक्तिमत्वावर चित्रपट बनवणे हे शिवधनुष्य पेलण्याइतकंच जिकरीचं आणि त्यातही त्यांची व्यक्तिरेखा साकारणं हे त्याहूनही अवघड काम. परंतु या दोन्ही जबाबदाऱ्या अतिशय सक्षमपणे आपल्या खांद्यावर घेतल्या त्या दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि अभिनेते प्रसाद ओक यांनी. आनंद दिघे यांचा एवढा मोठा जीवनप्रवास चित्रपटात मांडणं तसं अवघडच काम. पण हा सगळा घाट घातला तो निर्माते मंगेश देसाई यांनी. त्यांच्या साहिल मोशन आर्टने या चित्रपटाची निर्मिती केली. चांगल्या कलाकृतींच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचं काम झी स्टुडिओज ही निर्मितीसंस्था कायमच करत आलेली आहे. याही चित्रपटासाठी आता झी स्टुडिओज निर्माते आणि प्रस्तुतकर्ते अशी दुहेरी जबाबदारी पार पाडणार आहे.

जनसामान्यांचा नेता
जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ति असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे 'लोककारणी' म्हणजे आनंद दिघे. त्यांच्यावरील बायोपिकची घोषणा झाल्यापासूनच यात आनंद दिघे यांची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले असून आनंद दिघेची दमदार व्यक्तिरेखा अभिनेता प्रसाद ओक साकारणार आहे. प्रवीण विठ्ठल तरडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे. झी स्टुडिओजच्या माध्यमातून येत्या १३ मे रोजी 'धर्मवीर मु.पो. ठाणे' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
हेही वाचा - KGF Chapter 2 : रॉकी भाईच्या चाहत्यांनी केले KGF 2 चे भव्य स्वागत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.