ETV Bharat / entertainment

विकी जैनला वाटते टॉप 5 मध्ये असेल मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे नाराज

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 19, 2024, 2:10 PM IST

Bigg Boss 17 day 96 highlights: बिग बॉस 17 चा गुरुवारचा एपिसोड कडाक्याची भांडणं आणि ड्रामाने भरलेला होता. अंकिता लोखंडेच्या रडण्याने घरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तिने विकी जैनवर तिच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आणि मन्नारा चोप्राला पाठिंबा दिल्याचा आरोप केला.

Bigg Boss 17 day 96 highlights
विकी जैनला वाटते टॉप 5 मध्ये असेल मन्नारा चोप्रा

मुंबई - Bigg Boss 17 day 96 highlights: जसजसा बिग बॉस 17 हा रिअ‍ॅलिटी टीव्ही शो संपण्याच्या मार्गावर आहे, तसतसे घरातील भांडणे अधिकच तीव्र होत आहेत. अवघे दोन आठवडे शिल्लक असताना, हा शो मोठ्या प्रमाणात गाजला आहे. गुरुवारच्या एपिसोडमध्ये पती-पत्नी जोडी विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यात मन्नारा चोप्रावरून कडाक्याचं भांडण झाले.

अंकिता लोखंडेला विकी जैनने केले दुर्लक्षित - 96 व्या एपिसोडमध्ये अंकिता लोखंडे, ईशा आणि विकीसोबत संवाद साधताना दिसली होती. त्यांच्याशी बोलताना ती म्हणाली, माझ्या सासूबाईंनी मला सांगितले होतं की विकी आणि मी भांडू नये. विकीने अंकिताकडे दुर्लक्ष केले आणि ईशाशी बोलणे चालू ठेवले आणि तिने आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. विकीला मग अंकिताने विचारले, "तुला ऐकायचे आहे की नाही?" विकी थंडपणे उत्तर देताना म्हणाला, "मी तुला टाळू शकत नाही, हा काय टोन आहे, तिसरी व्यक्ती इथे बसली आहे." त्यानंतर अंकिताने पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा विकीने हसण्यावर नेले. तो आपल्याकडे दुर्लक्ष करतोय या भावनेनं अंकिता लोखंडेला दुःख झालं आणि ती रडत खोलीतून निघून गेली.

विकीच्या कृत्यामुळे अंकिता असह्यपणे रडत राहिली. तिचं रडणं पाहून विकीने विचारले, "तू ओव्हर रिअ‍ॅक्ट का करतेस? कशासाठी एवढी ओव्हर रिऍक्शन?" यावर अंकिता तिच्या पाठीमागे तिच्याविषयी हसल्याबद्दल त्याला दोष देते. ती म्हणाली, "माझ्या पाठी मागे हसतोस, इतक्या लो कॉन्फीडन्सनं मी चालली आहे का?. मी माझा मुद्दा मांडायचा प्रयत्न करतेय आणि तू माझ्या माघारी हसतोस?"

विकी जैनने केला मन्नारा चोप्राचा बचाव - मन्नाराला ती शेवटच्या आठवड्यात येण्यास पात्र आहे असे सांगितल्यानंतर अंकिताचा विकीशी संघर्ष झाल्याचं पाहायला मिळाले. अंकिता, ईशा आणि आयशा मन्नारावर चर्चा करताना दिसले, पण विकीला ते आवडले नाही. त्यांनी सांगितले की ते या विषयावर सतत चर्चा करत आहेत आणि त्यांना ते आवडत नाही. विकी मन्नाराबद्दल बचावात्मक बनत आहे असे तिला वाटत असल्याने अंकिता चिडली.

अंकिता लोखंडेने मुनावर फारुकीला डरपोक म्हटले - संतापलेल्या अंकिताने मुनावरला भ्याड आणि बेईमान म्हणत शिवीगाळ केली. ईशा आणि अंकिताने मुनावरला बोलावले आणि दावा केला की तो केवळ त्याच्या चाहत्यांमुळे फिनालेच्या आठवड्यात पोहोचला आहे. शिवाय, ईशाने मन्नाराशी झुंज दिली आणि मुनवरमुळे खेळात टिकून राहिल्याबद्दल तिची खिल्ली उडवली. समर्थ, अभिषेक, अंकिता आणि विकी यांच्यामुळे ईशाही शोमध्ये आली होती असे सांगून मन्नाराने प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न केला. ईशा, अंकिता आणि आयशा या तिघीही मन्नाराला ट्रोल करताना दिसल्या. मात्र, मुनावरने मन्नाराला यावर जास्त लक्ष केंद्रित करू नका, असे सांगितले.

मन्नारा चोप्रा आणि अरुण मॅशेटे यांची मुनावर फारुकीशी चर्चा - मुनावर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण मॅशेटे यांनी शेवटच्या आठवड्यात प्रवेश केल्यावर, मन्नारा आणि अरुण खेळ पुढे जाण्याची चर्चा करताना दिसले. मन्नाराने अरुणला सांगितले की त्यांनी मुनावरवर विश्वास ठेवू नये कारण त्याच्यात खऱ्या भावना नाहीत आणि तो व्यावसायिक आहे. अरुणने सांगितले की आपण ते त्याच्याकडे कॅज्युअल ठेवले पाहिजे आणि जास्त चांगले वागू नये.

बिग बॉस स्पर्धकांना लिझोल चॅलेंज देण्यात आले होते, आयशा खानसह विकी आणि अंकिता एकाच टीममध्ये होते. अभिषेक आणि मन्नारा यांना न्यायाधीश म्हणून निवडण्यात आले होते, तर आयशा आणि ईशा यांनी दोन्ही संघांसाठी सेल्सपीपलची भूमिका केली होती. ईशा, मुनावर आणि अरुण यांना मन्नारा आणि अभिषेक यांनी टास्कचे विजेते घोषित केले.

हेही वाचा -

  1. "पंतप्रधानांनी 'हृदय में श्रीराम' गीत शेअर करणं हा प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद": सुरेश वाडकर यांची ईटीव्ही भारतशी एक्स्लुझिव्ह प्रतिक्रिया
  2. अन्नपूर्णी वादावर नयनताराने सोडले मौन, पहिल्यांदाच व्यक्त केली भावना
  3. 20 व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सांगता; वेगवेगळे महोत्सव प्राधान्याने आयोजित होणे गरजेचे विकास खारगे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.