'रेड 2' मध्ये वाणी कपूर आणि रितेश देशमुख करणार स्क्रीन शेअर, अजय देवगणसोबत!

author img

By ETV Bharat Marathi Desk

Published : Jan 14, 2024, 4:47 PM IST

Raid 2

Raid 2 : 'रेड 2' या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगणसोबत वाणी कपूर दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत रितेश देशमुख दिसेल.

मुंबई - Raid 2 : राज कुमार गुप्ता दिग्दर्शित 'रेड' हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट राजकारण्याच्या घरावर आयकर विभागानं टाकलेल्या धाडीवर आधारित होता. ही सत्य घटना असून या चित्रपटात अजय देवगणसोबत इलियाना डिक्रूज दिसली होती. या राजकारण्याच्या घरावर आयकर विभागानं टाकलेली धाड जवळपास 3 दिवस दोन रात्री, चालली होती. अजय देवगण स्टारर या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान 'रेड 2'बाबत एक अपडेट समोर आली आहे. या चित्रपटामध्ये आता इलियाना डिक्रूज ऐवजी वाणी कपूर मुख्य भूमिकेत असेल. अजय देवगणसोबत आणि वाणी कपूर पहिल्यांदी स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

रेड 2
रेड 2
Raid 2
रेड 2

'रेड 2' चित्रपटात झळकेल वाणी कपूर : 'रेड 2' चित्रपटाबद्दल बोलाताना वाणी कपूरनं म्हटलं, ''अजय देवगण सोबत स्क्रीन शेअर करायला मिळणे हा माझ्यासाठी सन्मान आहे.'' 'शुद्ध देसी रोमान्स' आणि 'चंदीगढ करे आशिकी', 'शमशेरा', 'वॉर' यासारख्या चित्रपटांमध्ये काम करणारी वाणी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहे. अजय देवगणसोबत तिची केमिस्ट्री कशी असेल हे पाहण्यासारखी असेल. वाणी एका मुलाखती दरम्यान सांगितलं, ''अजय देवगणच्या कामाची मी नेहमीच मोठी चाहती राहिली आहे. त्यांचे बरेच चित्रपट आहेत जे मला आवडतात. त्यामुळे आपल्या देशातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या अजय सरांसोबत स्क्रीन शेअर करणं ही एक चांगली गोष्ट आहे. मला वाटते की यांच्यासोबत काम करणे आणि सेटवर त्यांचे निरीक्षण करणे हे एक कलाकार म्हणून माझा अनुभवात अधिक भर पडेल. 'रेड' हा मनोरंजक चित्रपटांपैकी एक आहे आणि 'रेड 2' नक्कीच पुन्हा जगभरातील लोकांचे मनोरंजन करेल.''

रितेश देशमुख दिसणार नकारात्मक भूमिकेत : 'रेड 2'मध्ये रितेश देशमुखची सुद्धा वर्णी लागली आहे. पहिल्या भागात सौरभ शुक्ल व्हिलनच्या भूमिकेत होता. आता दुसऱ्या भागात त्याची जागा रितेश देशमुख घेईल. या चित्रपटात रितेश नकारात्मक भूमिकेत दिसणार असून त्याचा हा अवतार कसा असेल याबद्दल त्याच्या फॅन्सला उत्सुकता लागली आहे. 'रेड 2' चे निर्माते भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता करीत आहेत. नुकतेच याचे शुटिंग सुरु झाले असून या चित्रपटाचे शूट मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये होणार आहे. हा चित्रपट गुलशन कुमार आणि टी-सीरीज प्रस्तुत करीत आहेत. पॅनोरमा स्टुडिओची निर्मिती असणारा हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस 17'मध्ये अंकितासह विकी जैनला ज्योतिषींनी दिला 'हा' सल्ला
  2. वरुण तेज आणि मानुषी छिल्लर स्टारर 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'मधील 'वंदे मातरम' गाणं वाघा बॉर्डरवर होणार लॉन्च
  3. नवीन वर्षात कोणत्या वेबसीरीज पाहाव्यात? 'या' कलाकारांचे सिनेमा झाले आहेत प्रदर्शित
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.