ETV Bharat / entertainment

Tanushree Dutta : तनुश्री दत्तानं राखी सावंतविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 7:55 PM IST

Tanushree Dutta : तनुश्री दत्तानं राखी सावंतविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मीडियाशी बोलताना तनुश्रीनं सांगितलं की, राखीवर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही प्रक्रिया पूर्ण करत आहोत.

Tanushree Dutta
तनुश्री दत्ता

मुंबई Tanushree Dutta : अभिनयासोबतच काही वर्षांपूर्वी MeToo चळवळीमुळे चर्चेत असलेली तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत सक्रिय होताना दिसत आहे. तनुश्रीने आता राखी सावंतविरोधात तक्रार दाखल केली आहे. तनुश्रीनं राखी सावंतविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तिनं अनेक आरोप केले आहेत. यावेळी तनुश्रीचे वकीलही उपस्थित होते. मीडियाशी बोलताना तनुश्री सांगितलं की, राखीवर अनेक कलमं लावण्याची विनंती केली आहे. तनुश्रीनं सांगितलं की, राखीनं वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये माझ्यावर अनेक आरोप केले आहेत. तिनं माझी बदनामी केली आहे.

  • #WATCH | Mumbai: "Our process of filing an FIR is continued. Today we will complete the FIR. Rakhi Sawant had made 5-6 videos where she made false & baseless allegations that put me in distress...She had admitted that she had got money to do those press conferences...I do not… pic.twitter.com/sNUdMBmj0m

    — ANI (@ANI) October 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय आहे तनुश्री दत्ताचे प्रकरण : राखी सावंत विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर तनुश्री दत्ताने मीडियाशी संवाद साधला आणि आता पोलीस तिच्यावर कारवाई करणार असल्याचं तिनं सांगितलं आहे. तनुश्रीनं पुढे सांगितलं, 'हे संपूर्ण प्रकरण 2008 सालचं आहे, जेव्हा राखीला 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटातून रिप्लेस करण्यात आले होतं. तेव्हापासून तिला माझ्यासोबत काम करण्यास समस्या होत्या. त्यानंतर माझ्यासोबत वाद निर्माण केल्यानंतर निर्मात्यानं राखीला परत या चित्रपटामध्ये घेतलं. यानंतर, 2018 मध्ये MeToo चळवळीदरम्यान, मला राखीमुळे खूप भावनिक आघात सहन करावा लागला. तिने माझ्या विरोधात जे काही सांगितलं ते सर्व खोटं आहे, माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. आता तिला मी सोडणार नाही.

तनुश्री म्हणाली - खूप भावनिक आघात झाला : तनुश्रीनं पुढे म्हटलं, 'निर्मात्यानं माझे सर्व चेक बाऊन्स केले. निर्मात्यांनी अशी चुकीची कामे करू नयेत असं मला वाटतं. त्यावेळी माझं नाव चांगलंच प्रसिद्ध होतं. मी चांगले चित्रपट केले होते. 'आशिक बनाया आपने' हा चित्रपटही माझा गाजला होता. जर माझे 'हॉर्न ओके प्लीज'मधील ते गाणे रिलीज झाले असते तर मला आणखी काम मिळाले असते. यामुळे मला खूप भावनिक आघात सहन करावा लागला. तनुश्री दत्ताने नाना पाटेकरचाही उल्लेख केला.

हेही वाचा :

  1. India vs Pakistan Cricket World Cup 2023:अरिजित सिंगच्या जादूनं खचाखच भरलेल्या स्टेडियमला घातली भुरळ
  2. Sam Bahadur : विकी कौशलनं हुबेहुब साकारले सॅम माणेकशॉ , उलगडला भारतीय सैन्याचा वैभवशाली इतिहास
  3. IND Vs PAK : भारत आणि पाकिस्तान सामन्या दरम्यान 'या' चित्रपटांचे होणार प्रमोशन....
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.