ETV Bharat / entertainment

Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत मुंबई विमानतळावर स्पॉट; चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव...

author img

By

Published : May 8, 2023, 3:43 PM IST

साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांना मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. यावेळी ते साध्या पोशाखात दिसले. यावर अनेक चाहते त्याच्या साध्या लूकवर भारावून गेले आणि त्त्याच्या या लूकवर कौतुकाचा वर्षाव केला.

Rajinikanth
रजनीकांत

मुंबई : साऊथ अभिनेता रजनीकांत यांना साधेपणासाठी ओळखले जाते. अनेक कार्यक्रमात ते अत्यंत साध्या पोशाखात दिसतात. अलिकडेच त्यांना 7 मे रोजी मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं.

त्यांचा विमानतळावरील लूक कॅज्युअल होता. त्यांनी निळ्या रंगाचा टी-शर्ट, ग्रे रंगाची पॅन्ट आणि ग्रे रंगाचा जोडा घातला होता. त्यांच्या हातात काळ्या रंगाची बॅग होती. विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी त्यांचे चाहते गोळा झाले होते. त्यांनी चाहत्याकडे स्मित हास्य दिले आणि त्याच्या नम्रतेला बघून चाहते हे भारावून गेले. त्यांचा हा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा या व्हिडिओवर चाहत्यांची प्रतिक्रिया दिल्या अनेक चाहत्यांनी त्याला डाउन टू अर्थ असल्याचे म्हटले.

रजनीकांतचा चित्रपट : काही चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. तसेच या व्हिडिओला चाहते शेअर आणि लाईक देखील करत आहे. रजनीकांत यांचा जबरदस्त फिटनेस आजही आश्चर्याचा विषय आहे. सतत शुटिंगच्या कामात ते गुंतलेले असतात. त्याच्या कामाबद्दल बोलायला गेल तर लवकरच रजनीकांत हे आगामी 'जेलर' चित्रपटात जेलर मुथुवेल पांडियनची भूमिका साकारणार आहेत. जेलर हा नेल्सन दिलीपकुमार यांनी लिहिलेला चित्रपट आहे आणि हा चित्रपट पूर्ण अ‍ॅक्शन मनोरंजन करणारा असणार आहे. या चित्रपटात रजनीकांत मुख्य भूमिकेत रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत. तर या चित्रपटात जॅकी श्रॉफ, रम्या कृष्णन, तमन्ना आणि विनायकन हे सहाय्यक कलाकारांमध्ये दिसणार आहेत. तसेच या चित्रपटात मोहनलाल आणि शिवा राजकुमारही कॅमिओच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना अ‍ॅक्शन बघालला मिळेल.

जेलर चित्रपट : रजनीकांतचा हा चित्रपट प्रेक्षकांचे फार मनोरंजन करणारे असणार आहे. कारण या चित्रपटात प्रेक्षकांना मनोरंनाचा तडका भेटणार आहे. सन पिक्चर्सच्या मोठ्या बजेटमध्ये निर्मित हा चित्रपट असून , जेलरचे या चित्रपटाचे संगीतअनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे. अनिरुद्ध रविचंदर यांनी यापूर्वी ब्लॉकबस्टर हिट ठरलेले 'कोलावरी डी' या गाण्यासाठी संगीत दिले होते, त्यामुळे यावेळी या चित्रपटातील गाणी ही फार मधुर असणार हे नक्कीच. सिनेमॅटोग्राफर विजय कार्तिक कन्नन आणि संकलक आर निर्मल हे तांत्रिक टीमचा भाग आहेत. तसेच या चित्रपटाची वाट प्रेक्षक आतुरतेने पाहात आहेत.

हेही वाचा: AskSRK Shahrukh Khan : चाहत्याची जवान उद्याच प्रदर्शित करण्याची विनंती, शाहरुखने दिले मजेशीर उत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.