ETV Bharat / entertainment

Superstar Rajinikanth Jailer : सुपरस्टार रजनीकांतच्या 'जेलर' चित्रपटाने जगभरात केला ३५० कोटीचा आकडा...

author img

By

Published : Aug 15, 2023, 2:13 PM IST

सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने जगभरात ३५० कोटीची कमाई केली आहे. देशांर्तग या चित्रपटाने किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Rajinikanth
रजनीकांत

मुंबई : साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार रजनीकांत सध्या आपल्या 'जेलर' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. पहिल्या दिवशी चित्रपटाने चांगलीच कमाई केली होती. रजनीकांतचा क्रेझ हा संपूर्ण जगात आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाची धमाकेदार बुकिंग झाली होती. दरम्यान आता देखील चित्रपटगृहांमधील गर्दी थांबण्याचे नाव घेत नाही आहे. थलैवाची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे. पहिल्या दिवशी सुपरस्टार रजनीकांतच्या चित्रपटाने ४८.३५ कोटींची कमाई केली होती. ज्यापैकी ३७.६ कोटी फक्त तमिळ भाषेत होते. तर १०.२ कोटी तेलुगू भाषेतील कमाई होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने २५ कोटींची कमाई केली, ज्यामध्ये तमिळ भाषेने सर्वाधिक कमाई केली.

'जेलर' चित्रपटाने केली इतकी कमाई : रजनीकांत यांच्या 'जेलर' या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ३४ कोटींचा गल्ला जमवला. दुसरीकडे, चौथ्या दिवशी कमाईचा आकडा ३८ कोटींच्या आसपास होता. चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे ५ दिवस झाले असून देशांतर्गत या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन १७८.६० कोटी रुपयांवर गेले आहेत. या चित्रपटाने फार कमी वेळात मोठा आकडा पार केला आहे. रजनीकांतचा जेलर हा या वर्षातील साऊथचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट देशांर्गत ३०० कोटीचा टप्पा देखील लवकर पार करेल असा अंदाज बांधला जात आहे. हा चित्रपट देशात नाहीत तर जगभरात चांगली कमाई करत आहे. जगभरात या चित्रपटाने पाचव्या दिवशी ३५० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

'जेलर' चित्रपटाची स्टारकास्ट : 'जेलर' चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार यांनी केले आहे. या चित्रपटात रजनीकांत टायगर मुथुवेल पांडियनची भूमिका साकारत आहे. चित्रपटात विनायकन, रम्या कृष्णन वसंत रवी, मोहनलाल, शिव राजकुमार आणि जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. १५ ऑगस्टच्या सार्वजनिक सुट्टीकडून बऱ्याच अपेक्षा आता बाळगल्या जात आहे. हा चित्रपट या दिवशी २०० कोटीचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा केली जात आहे.

हेही वाचा :

  1. Omg 2 Box Office Collection Day 4 : 'ओह माय गॉड २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० कोटींचा टप्पा केला पार
  2. The Great Indian Family: अतरंगी फॅमिलीची धमाल कथा, विकी कौशलने करुन दिली इरसाल कुटुंबियांची ओळख
  3. Box office surprise: चायनीज चित्रपट 'नो मोअर बेट्स'ने ब्लॉकबस्टर 'बार्बी'ला टाकले पिछाडीवर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.