ETV Bharat / entertainment

मायोसिटिसशी झगडतेय सामंथा, बरी होण्याची बाळगलीय दुर्दम्य इच्छा

author img

By

Published : Oct 29, 2022, 4:12 PM IST

यशोदा ट्रेलर रिलीज झाल्याच्या दोन दिवसांनंतर, सामंथा रुथ प्रभूने तिच्या प्रकृतीबद्दलचा इन्स्टाग्रामवर खुलासा केला आहे. अभिनेत्रीने एका फोटोसह लांबलचक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये ती सलाईन लावून एका प्रोजेक्टचे डबिंग करताना दिसत आहे.

मायोसिटिसशी झगडतेय सामंथा
मायोसिटिसशी झगडतेय सामंथा

मुंबई - अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू हिचा आगामी चित्रपट यशोदाच्या ट्रेलरला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्री अनेक महिन्यांपासून लो प्रोफाइल ठेवत आहे आणि तिच्या चाहत्यांना आश्चर्य वाटतंय की त्यांची लाडकी अभिनेत्री अशी का वागतेय. त्यांना हे माहिती नाही की सामंथाचे मायोसिटिस नावाच्या स्वयंप्रतिकार स्थितीचे निदान झाले आहे.

यशोदा ट्रेलर रिलीज झाल्याच्या दोन दिवसांनंतर, सामंथा रुथ प्रभूने तिच्या प्रकृतीबद्दलचा इन्स्टाग्रामवर खुलासा केला आहे. अभिनेत्रीने एका फोटोसह लांबलचक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये ती सलाईन लावून एका प्रोजेक्टचे डबिंग करताना दिसत आहे.

यशोदा ट्रेलर लाँच झाल्यानंतर तिच्या वाटेवर आलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञतेने तिने पोस्टची सुरुवात केली. "यशोदा ट्रेलरला तुमचा प्रतिसाद जबरदस्त होता. हे प्रेम आणि संबंध मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करते, यामुळेच मला जीवनात माझ्यासमोर येणार्‍या न संपणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते."

तिच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल बोलताना सामंथाने लिहिले, "काही महिन्यांपूर्वी मला मायोसिटिस नावाच्या ऑटोइम्यून कंडिशनचे निदान झाले होते. त्यातून मुक्त झाल्यानंतर मला हे शेअर करण्याची अपेक्षा होती. पण माझ्या अपेक्षेपेक्षा थोडा जास्त वेळ लागत आहे. हळुहळू लक्षात आले की आपल्याला नेहमीच मजबूत आघाडीची आवश्यकता नसते. ही असुरक्षितता स्वीकारणे ही एक गोष्ट आहे ज्यासाठी मी अजूनही संघर्ष करीत आहे."

अभिनेत्रीने असेही सांगितले की डॉक्टरांना विश्वास आहे की ती लवकरच पूर्णपणे बरी होईल. तिच्या अस्वास्थ्याशी झगडत असताना, सामंथा म्हणाली की काही दिवस कठीण आहेत, "शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या...."

"मला आणखी एक दिवस सांभाळता येणार नाही असे वाटत असतानाही, तो क्षण कसा तरी निघून जातो. मला वाटते की याचा अर्थ असा होऊ शकतो की मी आणखी एक दिवस बरे होण्याच्या जवळ आहे." तिने पोस्टची समाप्ती सकारात्मक नोटवर केली आणि लिहिले, "माझे तुझ्यावर प्रेम आहे.. यातूनही बाहेर पडेन."

हेही वाचा - सलमानने विकी कौशलची हेरगिरी करायचीय म्हणताच लाजून चूर झाली कॅटरिना पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.