ETV Bharat / entertainment

Tiger 3 enters 100 crore club : सलमान कॅतरिनाच्या 'टायगर 3' ने 2 दिवसात केला 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2023, 5:04 PM IST

Tiger 3 enters 100 crore club
टायगर 3 चा 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश

Tiger 3 enters 100 crore club : सलमान खानच्या 'टायगर 3' चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्यानं केवळ दोन दिवसात चित्रपटानं १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केलाय. यशराज फिल्म्सनं या एका वर्षात ही किमया तिसऱ्यादा साधून हॅट्रीक केली आहे.

मुंबई - Tiger 3 enters 100 crore club : सुपरस्टार सलमान खानच्या 'टायगर 3' ची क्रेझ वाढतच चालली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं अवघ्या दोन दिवसांत १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 58 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे केवळ 2 दिवसांत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 101 कोटीवर पोहोचलंय.

व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी इन्स्टाग्रामवर याबद्दल पोस्ट सेअर करुन लिहिलं, "टायगरने 2 दिवसांत शतक ठोकलं... टायगर 3 नं दुसऱ्या दिवशी पार्कच्या बाहेर चेंडू भिरकावला ... 2 दिवसात १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडलाय. 2 दिवसात म्हणजेच 48 तासांत शतक ठोकणारा हा २०२३ मधील तिसरा हिंदी चित्रपट ठरला. यापूर्वी जानेवारीत पठाण, सप्टेंबरमध्ये जवान आणि आता हा तिसरा टायगर 3 ने ही कामगिरी केली आहे.

मनीष शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'टायगर 3' हा टायगर फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे आणि यशराज फिल्म्सच्या वॉर आणि पठाण सारख्या स्पाय युनिव्हर्सचा एक भाग आहे. विशेष म्हणजे टायगर 3 मध्ये शाहरुख खान आणि हृतिक रोशनचे पोस्ट-क्रेडिट कॅमिओ सीन देखील आहेत.

2019 च्या 'भारत' चित्रपटानंतर 'टायगर 3' हा सलमान खानसाठी 42.30 कोटींची कमाई करणारा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या दोन मागील चित्रपटाप्रमाणेच हा चित्रपट RA&W एजंट टायगर (सलमान) आणि ISI एजंट झोया (कतरिना कैफ) यांचा समावेश असलेल्या नवीन खतरनाक मोहिमेवर केंद्रित आहे. 2012 मध्ये आलेल्या 'एक था टायगर'चा पहिला भाग कबीर खाननं दिग्दर्शित केला होता. त्यानंतर 2017 मध्ये 'टायगर जिंदा है'या चित्रपटासह टायगर फ्रँचायझीचा विस्तार झाला. दुसरा भाग अली अब्बास जफरने दिग्दर्शित केला होता.

चित्रपट रिलीज होण्यापूर्वी सलमान खाननं चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खूप मेहनत केली होती. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हळहळू वातावरण निर्मिती होत गेली आणि कोणत्याही वादग्रस्त गोष्टी चित्रपटाबाबत तयार न झाल्यानं त्याचा लाभही झाला. यशराज फिल्म्सच्या या टायगर फ्रँचाइजला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय हे बॉक्स ऑफिसवरच्या आकड्यावरुन स्पष्ट होतंय.

हेही वाचा -

1. Kareena Kapoor Reveals : सैफसोबत लिव्हइनमध्ये 5 वर्षे राहिल्यानंतर 'लग्न का केलं', करीना कपूरचा खुलासा

2. Vicky Kaushal : 'कतरिना कैफ शिवाय कोण आवडतं' प्रश्नावर विकी कौशलचं मिश्किल उत्तर

3. Papa Meri Jaan: 'अनिमल'च्या नव्या गाण्यात रणबीर आणि अनिल कपूरमध्ये दिसलं पिता पुत्राचं नातं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.