ETV Bharat / entertainment

Arbaaz khan birthday : अरबाज खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत सलमान खान झाला ट्रोल...

author img

By

Published : Aug 5, 2023, 5:12 PM IST

अरबाज खानने ४ ऑगस्ट रोजी आपला ५६वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या पार्टीत सलमान हा हटके अंदाजात आला होता. सलमाचा हा अंदाज सोशल मीडिया युजरला पसंत पडला नाही, त्यामुळे सलमान आता ट्रोल केले जात आहे.

Salman Khan And  Arbaaz Khan
सलमान खान आणि अरबाज खान

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खानने ४ ऑगस्ट रोजी ५६ वा वाढदिवस साजरा केला. या पार्टीमध्ये अनेक कलाकार आले होते. मात्र या पार्टीमध्ये भाईजान सलमान खानच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले. सलमान आपल्या भावाच्या बर्थडे पार्टीला हटके अंदाजात आला होता. या पार्टीमध्ये सोहेल खानने देखील हजेरी लावली होती. यासोबतच अर्पिता आणि अलविरा या दोन्ही बहिणीही या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाल्या होत्या. अरबाज खानने आपल्या भावा-बहिणींसोबत घरी केक कापला. दरम्यान आता त्याने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अरबाज खान आपल्या दोन्ही भाऊ आणि बहिणींसोबत हॅप्पी बर्थडे टू यू अशा शुभेच्छा देताना दिसत आहेत. याशिवाय व्हिडिओमध्ये सलमान खान आणि सोहेल खान देखील खूप आनंदी दिसत आहेत. अरबाज खानने पोस्ट केलेल्या व्हिडिओवर अनेक चाहते आणि चित्रपटसृष्टीतील कलाकर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

अरबाजच्या पार्टीत सलमान झाला ट्रोल : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने या पार्टीत काळ्या रंगाच्या टी-शर्टवर राखाडी रंगाच्या शर्टसह गुलाबी रंगाची पॅन्ट परिधान केली होती. या लूकमध्ये सलमान नेहमीप्रमाणेच हँडसम दिसत होता, मात्र त्याला या लूकमुळे सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावर, वापरकर्ते भाईजानला त्याच्या गुलाबी पॅन्टच्या लूकला 'बार्बी' चित्रपटापासून प्रेरित असल्याचे म्हणत आहेत. सलमान खान हा असा सुपरस्टार आहे. ज्याचा लूक अनेक चाहत्यांना प्रेरणा देतो, सलमानचा हा लूक वापरकर्त्यांना आवडलेला नाही.

सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी काय म्हटले सलमानला : गुलाबी पँट घातलेल्या सलमानला नेटकऱ्यांनी धारेवर धरले आहे. एका यूजरने सलमानच्या लूकवर म्हटले, 'भाईचा हँगओव्हर कमी झाला नाही.' दुसऱ्या एकाने म्हटले 'भाईलाही बार्बी फीवर आला', अशा अनेक प्रकारच्या कमेंट या व्हिडिओवर येत आहे. दरम्यान सलमानच्या वर्कफ्रंट बोलायचे झाले तर तो शेवटी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामध्ये पूजा हेगडेसोबत दिसला होता. याशिवाय तो 'टायगर ३' या चित्रपटात कतरिना कैफसोबत दिसणार आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

हेही वाचा :

  1. kajol devgan : काजोलने आपल्या अभिनयाच्या जोरावर काबीज केली बॉलिवूड चित्रपटसृष्टी....
  2. Ajay Devgan wishes Kajol : 'तारीफ करुं क्या तेरी...' म्हणत अजय देवगणने काजोलला दिल्या रोमँटिक शुभेच्छा!
  3. Kangana Ranaut : कंगना रणौतचा हॉरर कॉमेडी 'चंद्रमुखी २'चा फर्स्ट लूक प्रदर्शित
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.