ETV Bharat / entertainment

Rubina Dilaik oozes retro vibes : रुबिना दिलैकचं मॅटर्निटी फोटोशूट, अभिनव शुक्लानं केले पोस्ट

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 1:22 PM IST

Rubina Dilaik oozes retro vibes : 'बिग बॉस 14' विजेती रुबिना दिलैक गर्भवती असून तिच्या मॅटर्निटी फोटोशूटमधील सुंदर फोटो तिचा पती अभिनव शुक्लानं सोशल मीडियावर पोस्ट केलेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्यानं, 'तू माझ्या आयुष्यातील एक अवर्णनीय चमत्कार आहेस', असं म्हटलंय.

Rubina Dilaik oozes retro vibes
रुबिना दिलैकचं मॅटर्निटी फोटोशूट

मुंबई - Rubina Dilaik oozes retro vibes : 'बिग बॉस 14' विजेती रुबिना दिलैक सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात खास क्षणांचा आनंद घेतेय. ती गर्भवती असून तिच्या मॅटर्निटी फोटोशूटमधील सुंदर फोटो तिचा पती अभिनव शुक्लानं इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्यानं, 'तू माझ्या आयुष्यातील एक अवर्णनीय चमत्कार आहेस', असं म्हटलंय.

मॅटर्निटी फोटोशूटसाठी रुबिनानं रेट्रो व्हायब्स देणारा इंडो-वेस्टर्न आउटफिट परिधान केला होता. तिनं लांब वेणी आणि सोन्याचे सुंदर नक्षीदार दागिने घातले होते. मेकअप आणि लाल लिपस्टिकसह तिचं अवखळ रुप आणखी बहरदार दिसत होतं. या फोटोत पाढऱ्या सूटसह तिचा पती अभिनव शुक्लाही छान दिसतोय. रुबिकाच्या या फोटोवर कमेंट करण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली. तिच्या सौंदर्याचं, तिच्या प्रेग्नंन्सीचं आणि या मॅटर्निटी फोटोशूटचं त्यांनी भरभरुन कौतुक केलंय.

रुबिना दिलैक आणि तिचा पती अभिनव शुक्ला यांनी अलिकडेच तिच्या प्रेग्नंसीची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. इंस्टाग्रामवर रुबिनानं अभिनवसोबतच्या तिच्या अलीकडील सहलीतील फोटोंची एक स्ट्रिंग शेअर केली होती. यामध्ये रुबिना काळ्या रंगाच्या पोशाखात तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. 'डेटिंग सुरू केल्यापासून आम्ही एकत्र जग एक्सप्लोर करण्याचं वचन दिलं होतं. आता आम्ही एका छोट्या सहप्रवाशाचं स्वागत करणार आहोत,' असं तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.

रुबिना दिलैक आणि अभिनव यांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा केला. एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये अभिनवने त्यांच्या लग्नाच्या यशस्वी पाच वर्षांचे श्रेय महादेवाच्या आशीर्वादाला दिले होते. महादेवच्या आशीर्वादाने 5 वर्षे झाली, असे सांगत त्यानं रुबिनासोबतच्या जीवन प्रवासाचं वर्णन केलं होतं.

अभिनव आणि रुबिना 'बिग बॉस 14' मध्ये स्पर्धक म्हणून आले होते. येण्याआधी ते घटस्फोट घेण्याच्या मार्गावर होते. मात्र बिग बॉसच्या घरात त्यांच्यातील मतभेद मिटले आणि ते पुन्हा एकमेकांवर प्रेम करु लागले. बिग बॉस 14 मधून बाहेर आल्यानंतर ते आनंदी विवाहित जोडपे म्हणून बाहेर आले.

हेही वाचा -

1. Elvish Yadav Snake Venom Case : एल्विश यादवची चौकशी करणाऱ्या पोलीस स्टेशन प्रभारीची उचलबांगडी

2. Vikrant Massey Interview :'12th Fail'चा नायक विक्रांत मॅसीही झाला होता नापास, प्रेरणादायी व्यक्तींची सांगितली नावं

3. Manish Malhotras Diwali bash : मनीष मल्होत्रा दिवाळी पार्टीत नवोदितांसह दिग्गज सेलेब्रिटींची मांदियाळी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.