ETV Bharat / entertainment

Ranveer Alia Dance Video : ढोलिडा गाण्याच्या शुटिंगदरम्यान आलियासोबत रणवीर सिंगने केला जबरदस्त डान्स

author img

By

Published : Apr 26, 2022, 5:17 PM IST

ढोलिडा या गाण्याच्या शुटिंगदरम्यान रणवीर सिंगने गंगूबाई काठियावाडीमधील ढोलिडा गाण्यावर आलिया भट्टसोबत जबरदस्त थिरकला. यावेळी त्याने आलियाचे कौतुक तर केलेच पण तिच्यासोबत नाचण्याची संधीही सोडली नाही

आलियासोबत रणवीर सिंगचा डान्स
आलियासोबत रणवीर सिंगचा डान्स

मुंबई - गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील ढोलिडा या गाण्यावर प्रेक्षक फिदा झाल्याचे पाहायला मिळाले. या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ आज रिलीज करण्यात आला. हे गाणे शूट करणे सोपे नव्हते. यासाठी आलिया भट्टने प्रचंड मेहनत घेतल्याचे व्हिडिओत पाहायला मिळते. विशेष म्हणजे या गाण्याच्या शुटिंग प्रसंगी रणवीर सिंग हजर होता. त्यानेही आलियासोबत ठुमके लावल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

ढोलिडा या गाण्याच्या शुटिंगदरम्यान रणवीर सिंगने गंगूबाई काठियावाडीमधील ढोलिडा गाण्यावर आलिया भट्टसोबत जबरदस्त थिरकला. गली बॉयमध्ये आलियासोबत काम केलेला रणवीर सिंग गंगूबाई सेटवर अवतरला होता. यावेळी त्याने आलियाचे कौतुक तर केलेच पण तिच्यासोबत नाचण्याची संधीही सोडली नाही.

सारेगामा म्युझिकने मंगळवारी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर ढोलिडा बनवण्याचा पडद्यामागचा व्हिडिओ शेअर केला आहे. रणवीर सिंगने यापूर्वी राम-लीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावतमध्ये संजय लीला भन्साळींसोबत काम केले आहे.

हेही वाचा - फरहान अख्तर शिबानी दांडेकर यांनी केला कोणी 'कुठे' प्रपोज केले याचा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.