ETV Bharat / entertainment

Animal Movie : रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल'च्या सेटवरील फोटो व्हायरल...

author img

By

Published : Jun 29, 2023, 4:15 PM IST

रणबीर कपूरचा त्याच्या आगामी 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील एक फोटो व्हायरल झाला आहे, हा फोटो चांगलाच चर्चेत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये रणबीर कपूरचा लूक जरा हटके आहे.

Animal Movie
अ‍ॅनिमल चित्रपट

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या चर्चेत आहे. अलीकडेच तो पत्नी आलिया भट्टसोबत दुबईच्या सुट्टीवरून परतला आहे. दुबईमधील या स्टार कपलचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही दिवसापूर्वी दुबईतील एका मॉलमध्ये मुलगी राहासाठी शॉपिंग करतानाचा रणबीर आणि आलियाचा फोटो व्हायरल झाला होता आणि आता त्याचा आणखी काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी रणबीरच्या दुबई व्हेकेशनमधील फोटो नाही तर त्याचा अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या सेटवरील हा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये रणबीर कपूर निळ्या रंगाच्या कोट पँटमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये तो फार जबरदस्त दिसत आहे.

अ‍ॅनिमलच्या सेटवरील रणबीर कपूरचा फोटो व्हायरल : 'अ‍ॅनिमल'च्या सेटवरील व्हायरल झालेल्या फोटोमध्ये, रणबीरच्या डोळ्यात अस्वस्थता आणि चेहऱ्यावर दुःख दिसून येत आहे. रणबीरने हटके हेअरस्टाईलसह भारी दाढीचा लूक घेतला आहे. या फोटोमध्ये रणबीर हा कॅमेऱ्यासमोर उभा आहे.

रणबीर आणि रश्मिका पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार : या मल्टीस्टारर चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे रणबीर आणि रश्मिका पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. तसेच या चित्रपटात अनिल कपूर आणि बॉबी देओल सारखे अनुभवी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अर्जुन रेड्डी आणि कबीर सिंगसारखे दमदार चित्रपट बनवणारे संदीप रेड्डी वांग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

रूपेरी पडद्यावर होणार आता चांगलीच टक्कर : या चित्रपटासाठी रणबीरच्या चाहत्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. कारण हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. दुसरीकडे, 11 ऑगस्टला सनी देओलचा गदर 2 आणि अक्षय कुमारचा ओह माय गॉड 2 बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमलशी टक्कर देणार आहे. इतकेच नाही तर रणबीर कपूरची पत्नी आलिया भट्टचा हॉलिवूड डेब्यू चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन देखील' 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे, परंतु तो ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. SPKK Movie : 'सत्यप्रेम की कथा' आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित, 'भूल भुलैया 2' चा रेकॉर्ड तोडू शकेल ?
  2. Leo Movie : 'लिओ' चित्रपटातील विजयचे 'ना रेड्डी' गाणे वादात अडकले
  3. Adipurush box office collection day 13 : बॉक्स ऑफिसवर 'आदिपुरुष' कोसळला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.