ETV Bharat / entertainment

Madhu Mantena Wedding : मसाबा गुप्ताचा पूर्व पती मधु मंटेना इरा त्रिवेदीसोबत पुन्हा चढला बोहल्यावर

author img

By

Published : Jun 12, 2023, 11:04 AM IST

निर्माते मधु मंटेना यांनी रविवारी मुंबईत लेखिका आणि योग शिक्षिका इरा त्रिवेदी यांच्याशी लग्न केले. या समारंभात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आले होते. या समारंभाचे फोटो इरा त्रिवेदीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.

Madhu Mantena Wedding
निर्माते मधु मंटेनाचे लग्न

मुंबई : निर्माते मधु मंटेना यांनी रविवारी मुंबईत लेखिका आणि योग शिक्षिका इरा त्रिवेदीशी लग्नगाठ बांधली. या कार्यक्रमाचे इराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती फार सुंदर दिसत आहे. या समारंभासाठी, मधूने धोतरासह एक ऑफ-व्हाइट कुर्ता निवडला तर इरा गुलाबी कांजीवरम साडी नेसली होती. याशिवाय तिने केसाचा बन बांधला होता. याव्यतिरिक्त तिने ज्वेलरी ही साडीला मॅच होणारी घातली होती. फोटोमध्ये मधुने पत्नी इराच्या हाताचे चुंबन घेतान पोझ दिली आहे. तसेच लग्नाचे फोटो शेअर करताना तिने लिहिले की, 'मी आता पूर्ण झाली आहे.' लग्न झाल्यानंतर मधु आणि इरा यांनी मुंबईत चित्रपटसृष्टीतील सदस्यांसाठी लग्नाचे रिसेप्शन आयोजित केले. तसेच यानंतर या समारंभासाठी, मधुने निळ्या रंगाचा पारंपारिक पोशाख परिधान केला होता तर इराने पांढर्‍या-टोन्ड सीक्वेंस्ड वर्क केलेला लेहेंग्या परिधान केला होता. यावर तिने हिरवा पन्ना डायमंड सेट घातला होता. या रिसेप्शनमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आले होते. या कार्यक्रमात अभिनेता आमिर खान हा पांढऱ्या कुर्ता पायजामामध्ये कार्यक्रमस्थळाबाहेर उभे राहून पापाराझीला फोटोसाठी पोझ देताना दिसला. तसेच त्यानंतर आमिरने मधुसोबत देखील फोटो काढला. यावेळी आमिरसोबत त्याचा मुलगा जुनैद खान देखील या पार्टी दिसला.

रिसेप्शन पार्टी : या कार्यक्रमात हृतिक रोशन हा गर्लफ्रेंड सबा आझादसोबत रिसेप्शनला उपस्थित होता. त्यांनी देखील फोटो काढण्यासाठी पापाराझी पोझ दिली. यावेळी हृतिक आणि सबा फार सुंदर दिसत होते. या कार्यक्रमात मधुर भांडारकर आपल्या पत्नीसह मधु आणि इरा यांच्या रिसेप्शनमध्ये आले होते. याशिवाय कार्यक्रमात राकेश रोशन, अनुपम खेर अनिल कपूर, दिग्दर्शक नितेश तिवारी पत्नीसह या कार्यक्रमात आले होते.

कार्यक्रमात आले बॉलिवूड स्टार : या कार्यक्रमात जॅकी श्रॉफ पांढऱ्या ब्लेझर आणि बेल-बॉटम पॅन्ट घालून आला होता. यावेळी त्याच्या हातात एक रोपटे होते. तसेच यावेळी विवेक ओबेरॉय हा कॅज्युअल पोशाखात आला होता. तसेच हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशन ही एका सुंदर पांढऱ्या लेहेंगामध्ये या कार्यक्रमात सहभागी झाली होती. याशिवाय सोनाक्षी सिन्हा ही बॉयफ्रेंड झहीर इक्बाल आणि हुमा कुरेशीसोबत या कार्यक्रमात पोहोचली होती. शनिवारी, या जोडप्याने लग्नाच्या विधींची सुरुवात मेहंदी समारंभाने केली जिथे बी-टाउन सेलिब्रिटींनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

पहिले लग्न : यापूर्वी मधूने फॅशन डिझायनर मसाबासोबत लग्न केले होते. 2015मध्ये त्यांचे लग्न झाले. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि 2019 मध्ये घटस्फोट घेतला. तसेच दुसरीकडे मसाबाने अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत जानेवारीत लग्नगाठ बांधली. मसाबाने देखील तिच्या लग्नाचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. मसाबापूर्वी मधु हा अभिनेत्री नंदना सेनसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मधुने 'गजनी', 'अग्ली' आणि 'क्वीन' सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार तो सध्या 'दंगल' दिग्दर्शक नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या महाकाव्यावर आधारित चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा सध्या झाली नाही आहे. दुसरीकडे, इरा एक लेखक असण्याव्यतिरिक्त एक योग तज्ञ आहे.

हेही वाचा :

  1. Rubina Dilaik Car Accident: बिग बॉस फेम रुबिनाच्या कारचा अपघात; ट्विट करून दिले हेल्थ अपडेट
  2. Mangal Dhillon Death: जुनूनमधून गाजलेले अभिनेते मंगल ढिल्लन काळाच्या पडद्याआड, कर्करोगाने प्रकृती होती गंभीर
  3. Madhu and Iras Mehndi ceremony: निर्माता मधू मंतेना अन् इरा त्रिवेदी आज अडकणार लग्नबंधनात, मेहंदी समारंभात आमिर-हृतिकची हजेरी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.