ETV Bharat / entertainment

Ponniyin Selvan 2 box office collection: मणिरत्नमच्या पोन्नियिन सेल्वन 2 ची पहिल्या दिवशी दमदार कमाई

author img

By

Published : Apr 29, 2023, 2:22 PM IST

मणिरत्नमच्या भव्य नाट्यमय ड्रामा चित्रपट पोन्नियिन सेल्वन 2 ने लोकांना चांगल्या संख्येने थिएटरमध्ये खेचले आहे. या चित्रपटाने एकूण 32 कोटी रुपयांचे कलेक्शन केले.

पोन्नियिन सेल्वन 2
पोन्नियिन सेल्वन 2

हैदराबाद - चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा एपिक ड्रामा पोन्नियिन सेल्वन 2 अखेर शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने एकूण 32 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. चित्रपटाच्या पहिल्या भागाला भारताच्या दक्षिण भागातही जबरदस्त यश मिळाले होते. असे दिसते की PS 2 तसेच रेकॉर्ड सेट करण्याचे लक्ष्य समोर बाळगून आहे.

पोन्नियिन सेल्वन 2 ची बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी जोरदार कमाई - एका इंडस्ट्री ट्रॅकरच्या मते, पोन्नियिन सेल्वन 2 ने शुक्रवारी 59.94% तमिळ, 10.20% हिंदी आणि 33.23% मल्याळम यासह 32 कोटी रुपये कमावले. मनोबाला विजयबालन, एक चित्रपट व्यापार विश्लेषक म्हणाल्या, 'तामिळाडू बॉक्स ऑफिसवर पोन्नियिन सेल्वन 2 साठी शुभ सुरुवातीचा दिवस. वारीसू चित्रपटाच्या कमाईला मागे टाकून चित्रपटाने वर्षातील दुसरे सर्वोत्तम ओपनिंग घेतले. थीनवू या चित्रपटाची कमाई अजूनही 2023 चे पहिले स्थानी कायम आहे.' रमेश बाला यांनी ट्विट केले, 'पोन्नियिन सेल्वन 2 ने गुरुवारी यूएसए टॉप 10 मध्ये 3 क्रमांकावर पदार्पण केले.. (प्रीमियर्स)', या महाकाव्य चित्रपटाला युएसएमध्ये देखील जोरदार सुरुवात झाली आहे. मलेशिया, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये या चित्रपटाने किती चांगली कामगिरी केली याचा उल्लेखही त्यांनी केला.

साऊथ इंडियामध्ये पोन्नियिन सेल्वन 2 ची दमदार सुरुवात - चित्रपटाचा पहिला भाग, जो कल्की कृष्णमूर्तीच्या त्याच नावाच्या कादंबरीचे रूपांतर आहे, सुरुवातीला सप्टेंबर 2022 मध्ये प्रकाशित झाला तेव्हा त्याला जबरदस्त ओपनिंग मिळाली. तामिळ चित्रपटाची आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग होती आणि जगभरात 80 कोटी रुपये कमावले होते. एकूणच, त्याची थिएटर रन संपेपर्यंत त्याने जगभरात 500 कोटींहून अधिक कमाई केली. आता PS2 ला अनुकूल प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये चांगले प्रदर्शन करेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा - Irrfan Still Lives In Memories : मृत्यूच्या तीन वर्षांनंतरही इरफान आठवणीत जीवंत, सहकाऱ्यांनी सांगतिले किस्से

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.